MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Electric Cycle Gigafactory: प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने गुंतवणूक केलेली EMotorad ही कंपनी भारतात जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक सायकल गिगाफॅक्टरी उभारणार आहे. या मेगा फॅक्टरीमध्ये सुरुवातीला 5 लाख ई-सायकल बनवल्या जाणार आहेत.
MS Dhoni-backed electric cycle maker EMotorad set to inaugurate e-cycle gigafactory in pune
MS Dhoni-backed electric cycle maker EMotorad set to inaugurate e-cycle gigafactory in pune Sakal
Updated on

Electric Cycle Gigafactory: प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने गुंतवणूक केलेली EMotorad ही कंपनी भारतात जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक सायकल गिगाफॅक्टरी उभारणार आहे. या मेगा फॅक्टरीमध्ये सुरुवातीला 5 लाख ई-सायकल बनवल्या जाणार आहेत. हा मोठा कारखाना पुण्यात असणार आहे. ओलाच्या धर्तीवर eMotoradने कंपनीचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. देशात दोन कारखाने सुरू करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे.

इमोटोराड कंपनीने सांगितले की, पहिल्या टप्प्यात हा कारखाना सुमारे 2.4 लाख चौरस फुटांमध्ये असणार आहे. बॅटरी, मोटार, डिस्प्ले आणि चार्जर येथे बनवले जातील. हे सर्व इलेक्ट्रिक वाहन उत्पादनासाठी आवश्यक घटक आहेत. देशातील वाहतुकीची वाढती मागणी लक्षात घेऊन ही गिगाफॅक्टरी तयार केली जाणार आहे.

MS Dhoni-backed electric cycle maker EMotorad set to inaugurate e-cycle gigafactory in pune
Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

वाहतुकीसाठी ई-सायकल हा चांगला पर्याय मानला जात आहे. ही ई-सायकल गिगाफॅक्टरी फेज 4 मध्ये बांधली जाईल. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, हा चीनबाहेर दक्षिण आशियातील सर्वात मोठा ई-सायकल कारखाना असणार आहे. ऑगस्टपासून ही गिगाफॅक्टरी पहिल्या टप्प्यात उत्पादन सुरू करेल. यानंतर प्रत्येक टप्प्यात उत्पादन क्षमता वाढवली जाईल.

जगभरात इलेक्ट्रिक सायकलींची बाजारपेठ वेगाने वाढत आहे

eMotorad चे CEO कुणाल गुप्ता म्हणाले की, इलेक्ट्रिक सायकलींची बाजारपेठ जगभरात झपाट्याने वाढत आहे. 2022 मध्ये त्याची किंमत 40 अब्ज डॉलर होती. इलेक्ट्रिक सायकलच्या क्षेत्रात संपूर्ण जग चीनवर अवलंबून आहे.

भारताला चीनच्या पुढे नेण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही आमचा व्यवसाय 2020 मध्ये सुरू केला. या 4 वर्षांत, eMotorad ही ई-सायकलची सर्वात मोठी निर्यातदार बनली आहे. आम्ही भारतातील सर्वात मोठा ब्रँड बनलो आहोत. लोक मोठ्या प्रमाणात ई-बाईक खरेदी करत आहेत.

MS Dhoni-backed electric cycle maker EMotorad set to inaugurate e-cycle gigafactory in pune
Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

कंपनीचे सीएमओ आदित्य ओझा म्हणाले की, चीन आणि तैवान सारखे देश उत्पादनात खूप चांगले आहेत. दुसरीकडे, भारताने सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केले आहे. हेच कारण आहे की eMotorrad ची उत्पादने तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरच्या बाबतीत अधिक चांगली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.