Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आपला व्यवसाय झपाट्याने वाढवत आहेत. अहवालानुसार, मुकेश अंबानी यांची कंपनी लवकरच घानाच्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत दूरसंचार सुविधा पुरवणार आहे.
NGIC चे कार्यकारी संचालक (Next gen Infra Co) हरकिरत सिंग म्हणाले की, Radisys Corp, Reliance Industries नियंत्रित कंपनी, घानाच्या Infraco ला नेटवर्क पायाभूत सुविधा, ऍप्लिकेशन्स आणि स्मार्ट फोन सेवा पुरवणार आहे. या वर्षाच्या अखेरीस घानामध्ये NGIC द्वारे दूरसंचार सुविधा पुरवल्या जाऊ शकतात. कंपनी घानामध्ये 5G नेटवर्क आणि इंटरनेट सेवा पुरवणार आहे.
ब्लूमबर्गशी बोलताना हरकिरत सिंग म्हणाले की, वेगाने वाढणाऱ्या या बाजारपेठेत वाजवी दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
ब्लूमबर्गच्या अहवालात हरकिरत सिंग यांनी सांगितले की दोन आफ्रिकन दूरसंचार कंपन्या, Ascend Digital Solutions Ltd आणि K-NET यांचा एकत्रितपणे नवीन कंपनीमध्ये 55% हिस्सा आहे. घानाच्या सरकारची NGICमध्ये फक्त 10% पेक्षा कमी मालकी असेल, तर स्थानिक मोबाइल ऑपरेटर आणि खाजगी गुंतवणूकदार उर्वरित हिस्सा घेणार आहेत. सिंग हे Ascend चे मुख्य कार्यकारी म्हणूनही काम करतात.
NGIC कडे पुढील दशकासाठी घानामध्ये 5G सेवा पुरवण्याचा अधिकार आहे, त्याचा परवाना 15 वर्षांसाठी वैध आहे. सिंग यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीचा पुढील तीन वर्षांत भांडवली खर्च 145 दशलक्ष डॉलर एवढा आहे.
अंबानींच्या Jio Infocomm Ltd च्या भारतातील यशाची पुनरावृत्ती करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. जिओने कमी किमतीचा डेटा आणि विनामूल्य व्हॉइस कॉलिंग सेवा पुरवल्यानंतर भारतीय दूरसंचार उद्योगात क्रांती घडवून आणली.
ज्यामुळे काही प्रतिस्पर्धी कंपन्या बंद झाल्या आणि काही कंपन्यांचे एकत्रीकरण झाले. जिओने कोट्यवधी भारतीयांसाठी मोबाईल डेटा कमी किमतीत उपलब्ध करुन दिला. सध्या जिओ 470 दशलक्ष वापरकर्त्यांसह भारतातील सर्वात मोठी मोबाइल ऑपरेटर कंपनी आहे.
रिलायन्स आणि NGIC यांच्यातील सहकार्य हा भारताचा राजनैतिक विजय आहे, कारण डिजिटल उपक्रमांद्वारे आफ्रिकेतील चीनचा वाढता प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.