Ambani Vs Adani: गौतम अदानी भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यात यशस्वी झाले होते, परंतु काही दिवसांतच मुकेश अंबानी हे पुन्हा क्रमांक एकवर आले आहेत. जगातील अब्जाधीशांच्या यादीत अदानी 94.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 14व्या स्थानावर आहे, तर अंबानी 12व्या स्थानावर आहेत.
गौतम अदानी यांच्यासाठी 2024 वर्षाची सुरुवात चांगली झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानी यांच्या संपत्तीत यावर्षी 13.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यातून त्यांनी गेल्या गुरुवारी 7.67 अब्ज डॉलर्सची कमाई केली.
मात्र आता त्यांना 3.9 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन झाले आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती घसरुन 94.50 अब्ज डॉलर झाली. 536 दशलक्ष डॉलर कमाईसह अंबानी 97.5 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक बनले आहेत. यासह त्यांनी अदानींकडून आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीचा मुकुट पुन्हा मिळवला आहे.
दोन्ही भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीतील फरक पाहिला तर त्यांच्या एकूण संपत्तीत 3 अब्ज डॉलर्सचा फरक आहे. टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 219 अब्ज डॉलर्स आहे.
तर Amazon चे जेफ बेझोस यांच्याकडे 170 अब्ज डॉलर्सची संपत्ती असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जगातील तिस-या क्रमांकावर फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट 167 अब्ज डॉलर्ससह या स्थानावर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.