Tesla in India: इलॉन मस्क पुण्यात उभारणार टेस्लाचा प्रकल्प? मुकेश अंबानींशी चर्चा सुरु

Tesla in India: टेस्लाचा भारतात प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. यासाठी टेस्लाने यापूर्वी अनेक राज्य सरकारांशी आपले उत्पादन प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा केली होती. अलीकडेच एका अहवालात असे समोर आले आहे की टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क भारतात प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिक भागीदार शोधत आहेत.
Tesla
Tesla in IndiaSakal
Updated on

Tesla in India: टेस्लाचा भारतात प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. यासाठी टेस्लाने यापूर्वी अनेक राज्य सरकारांशी आपले उत्पादन प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा केली होती. अलीकडेच एका अहवालात असे समोर आले आहे की टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क भारतात प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिक भागीदार शोधत आहेत.

वृत्तानुसार अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीसोबत भारतात त्यांची उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी संयुक्त उपक्रमासाठी बोलणी करत आहे. याचा अर्थ टेस्लाच्या भारतात प्रवेश करण्यात रिलायन्सचीही भूमिका असू शकते.

द हिंदूमधील वृत्तानुसार, या प्रकरणाशी जवळीक असलेल्या एका सूत्राने सांगितले की, चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे आणि एका महिन्याहून अधिक काळ सुरू आहे. या संयुक्त उपक्रमाद्वारे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्षमता वाढवण्याचे RIL चे उद्दिष्ट आहे.

अहवालात दुसऱ्या स्त्रोताचा हवाला देऊन म्हटले आहे की, "RILची भूमिका अद्याप स्पष्ट नसली तरी, अशी अपेक्षा आहे की रिलायन्स समूह भारतात टेस्लासाठी उत्पादन प्रकल्प आणि संबंधित इकोसिस्टम स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल."

Tesla
Ola Cabs: 'ओला'चा मोठा निर्णय! 'या' ठिकाणची सेवा करणार बंद; कर्मचाऱ्यांना पाठवली नोटीस

रिलायन्सने अशोक लेलँडसोबतही भागीदारी केली

याआधीही, 2023 मध्ये, RIL ने अशोक लेलँड सोबत भागीदारी केली होती, ज्या अंतर्गत भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक लाँच करण्यात आला होता.

टेस्लाने भारतात उत्पादन प्रकल्प सुरू केल्याच्या बातम्यांदरम्यान, अनेक राज्य सरकारे कंपनीला त्यांच्या राज्यात कारखाने सुरू करण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शर्यतीत गुजरात आघाडीवर असून तामिळनाडू आणि तेलंगणाही मागे नाहीत. पुण्यातील औद्योगिक क्षेत्रात कारखाना सुरू करण्यासाठी महाराष्ट्राने टेस्लाशी संपर्क साधला आहे.

अमेरिकेतील टेस्ला टीम भारतात येऊन 200 ते 300 कोटी डॉलर्स खर्चून इलेक्ट्रिक वाहन कारखाना उभारण्यासाठी जमिनीची पाहणी करणार असल्याचे वृत्त होते.

माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, टेस्लाला आकर्षित करण्यात गुजरात आघाडीवर आहे. तामिळनाडू आणि तेलंगणा, ज्यांच्याकडे वाहनांच्या निर्मितीसाठी मजबूत पायाभूत सुविधा आहेत, ते देखील हा प्रकल्प साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पुण्यातील प्लांटसाठी महाराष्ट्रही टेस्लाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

Tesla
Adani Group: पुण्याच्या आयटी हबमध्ये अदानी करणार मोठी गुंतवणूक; 25 एकर जमीन केली खरेदी, काय आहे प्लॅन?

टेस्ला भारतात येणे महत्त्वाचे आहे कारण जगभरात त्याची विक्री घटली आहे. इलॉन मस्कच्या कंपनीची जागतिक विक्री या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 8.5 टक्क्यांनी घसरून 3,86,810 वाहनांवर आली आहे. चीनमधील स्थानिक ईव्ही उत्पादकांकडून कठीण स्पर्धेमुळे टेस्लाच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()