Mukesh Ambani: मुकेश अंबानींना पुन्हा धमकी! सात दिवसात चौथ्यांदा आला मेल

Mukesh Ambani Threat: मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या ईमेलची संख्या वाढत आहे.
Mukesh Ambani receives fresh threatening emails for ignoring previous demand
Mukesh Ambani receives fresh threatening emails for ignoring previous demand Sakal
Updated on

Mukesh Ambani Threat: मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकीचा मेल आला आहे. दोन धमकीचे मेल आले आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख शादाब खान अशी दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या ईमेलची संख्या वाढत आहे.

मुकेश अंबानींना गेल्या 7 दिवसात 4 वेळा धमक्या आल्या आहेत. या नवीन मेलमध्ये अंबानी यांनी 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान पाठवलेल्या ईमेलकडे आणि पैशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे.

26 ऑक्टोबर रोजी पहिला धमकीचा ईमेल आला होता. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने 20 कोटी रुपयांची मागणी केली होती. नंतर त्याची किंमत 200 कोटी रुपये करण्यात आली. पैसे न दिल्यास मुकेश अंबानींना गोळ्या घालू, असेही त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर तिसऱ्या ईमेलमध्ये त्याने 400 कोटींची मागणी केली होती.

अंबानींच्या अधिकृत आयडीवर पाठवलेला तिसरा ईमेल होता, ''तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही आम्ही तुम्हाला मारू शकतो. यावेळी किंमत 400 कोटी रुपये आहे आणि पोलीस तपास करुन मला अटक करू शकत नाहीत.''

Mukesh Ambani receives fresh threatening emails for ignoring previous demand
Diwali Bonus: बॉसने कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड! बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना भेट दिली कार

मुंबई पोलीस अजूनही इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजेच जुन्या ईमेलचा आयपी पत्ता शोधण्यात व्यस्त आहेत. पोलिसांनी इंटरपोलच्या माध्यमातून या ईमेलच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी बेल्जियन व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क कंपनी (VPN) ची मदत मागितली आहे.

हे मेल shadabkhan@mailfence.com वरून पाठवण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते हा आयपी अॅड्रेस बेल्जियमचा आहे. परंतु पोलिसांना संशय आहे की धमकी देणारी व्यक्ती दुसऱ्या कोणत्यातरी देशात आहे आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बेल्जियमचे नेटवर्क वापरत आहे.

Mukesh Ambani receives fresh threatening emails for ignoring previous demand
Share Market: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताय, थोडं थांबा हे वाचा! 2024 च्या लोकसभेचा....

गेल्या वर्षीही दिली होती धमकी

मुकेश अंबानींना अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून धमकीचे कॉल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली होती. आरोपींनी मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.