Forbes list: फोर्ब्स श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पुन्हा नंबर वन, गौतम अदानी कोणत्या स्थानी?

Forbes list of India's 100 Richest: फोर्ब्स एशियाने जाहीर केलेल्या भारतातील 100 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पुन्हा एकदा मुकेश अंबानींनी पहिले स्थान मिळवले आहे.
Mukesh Ambani reclaims top spot on Forbes list of India's 100 Richest
Mukesh Ambani reclaims top spot on Forbes list of India's 100 Richest Sakal
Updated on

Forbes list of India's 100 Richest: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी फोर्ब्स एशियाने जाहीर केलेल्या भारतातील 100 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. त्यांची एकूण संपत्ती 92 अब्ज डॉलर एवढी आहे. भारतीय चलनात 7.65 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी, ते या यादीत पहिल्या स्थानावर होते परंतु यूएस शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्गच्या अहवालाने कंपनीच्या मोठा धक्का दिला आणि त्यांच्या एकूण संपत्तीत 82 अब्ज डॉलर वरून 68 अब्ज डॉलरची घसरण झाली.

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर एचसीएलचे संस्थापक शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 29.3 अब्ज डॉलर आहे. या वर्षी, एचसीएल टेकच्या नेट वर्थमध्ये 42 टक्क्यांनी वाढ होत आहे.

चौथ्या स्थानावर सावित्री जिंदाल आहेत. 46 टक्क्यांच्या वाढीसह त्यांची एकूण संपत्ती 24 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Mukesh Ambani reclaims top spot on Forbes list of India's 100 Richest
Share Market: शेयर बाजारात दिवस संयमाचे आहेत

5 व्या स्थानावर DMart चे संस्थापक राधाकिशन दमाणी आहेत. त्यांची संपत्ती घसरली आहे. आणि 4 अब्ज डॉलरची घसरण होऊन 23 अब्ज डॉलर झाली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे एमडी सायरस पूनावाला सहाव्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 20.7 अब्ज डॉलर आहे. हिंदुजा कुटुंब 20 अब्ज डॉलर्ससह सातव्या क्रमांकावर आहे. आठव्या स्थानावर दिलीप संघवी आहेत, त्यांची एकूण संपत्ती 19 अब्ज डॉलर्स आहे. कुमार बिर्ला 17.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह नवव्या स्थानावर आहेत. शापूर मिस्त्री आणि कुटुंब 10 व्या स्थानावर आहेत.

Mukesh Ambani reclaims top spot on Forbes list of India's 100 Richest
TCS Share Buyback: टाटा करणार गुंतवणूकदारांना मालामाल! एका शेअरमागे मिळणार 4,150 रुपये

फोर्ब्सच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत तीन नवीन नावांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पहिले नाव एशियन पेंट्सच्या दानी कुटुंबाचे आहे. ते 8 अब्ज डॉलर्ससह 22 व्या स्थानावर आहेत. दुसरे नाव रेणुका जगतानी. त्या लँडमार्क ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. त्या 4.8 अब्ज डॉलर्ससह 44व्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.