Mukesh Ambani Threat: मुकेश अंबानींना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक

Mukesh Ambani Threat: 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Mukesh Ambani Threat 19-year-old from Telangana arrested for sending threat emails to Mukesh Ambani
Mukesh Ambani Threat 19-year-old from Telangana arrested for sending threat emails to Mukesh Ambani Sakal
Updated on

Mukesh Ambani Threat: उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी तेलंगणातील 19 वर्षाच्या तरुणाला शनिवारी पहाटे मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख गणेश रमेश वनपारधी असे केली असून त्याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात अंबानी यांना पाच ईमेल आले होते त्यामध्ये पैशांची मागणी केली होती आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.

“हे काम किशोरवयीन मुलांनी केले असल्याचे दिसून येत आहे. आमचा तपास सुरू आहे आणि आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू,” मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा देत सांगितले.

Mukesh Ambani Threat 19-year-old from Telangana arrested for sending threat emails to Mukesh Ambani
RBI Action: RBI ची मोठी कारवाई, 4 मोठ्या बँकांना ठोठावला दंड, काय आहे कारण?

27 ऑक्टोबर रोजी शादाब खान या नावाने पाठवलेल्या पहिल्या ईमेलमध्ये लिहिले होते की, "जर तुम्ही (अंबानी) आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शुटर आहेत."

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना आणखी एक धमकीचा ईमेल आला होता. त्यांच्याकडून 400 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. खंडणीची मागणी करणारे मेल सातत्याने येत आहेत.

Mukesh Ambani Threat 19-year-old from Telangana arrested for sending threat emails to Mukesh Ambani
Gold Investment: 1 ग्रॅम सोने खरेदी करा अन् 2.50 टक्के व्याज मिळवा; काय आहे मोदी सरकारची योजना?

नवीन मेलमध्ये धमकी पाठवणाऱ्याने दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान दोन धमकीचे ईमेल आले होते. पाठवणाऱ्याने स्वत:ची ओळख शादाब खान अशी करुन दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.