Reliance Disney Merger: उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा करार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आगामी काळात ओटीटी आणि मीडियामध्ये आपला दबदबा वाढवण्यासाठी रिलायन्स समूह डिस्नेकडून स्टार इंडियाचा व्यवसाय विकत घेण्याचा अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. रिलायन्स-डिस्नेच्या या कराराला आता भारतीय स्पर्धा आयोगाकडून (CCI) अंतिम मंजुरी मिळाली आहे. मात्र, सीसीआयने रिलायन्सला आपल्या 7 वाहिन्या विकण्याची अटही घातली आहे.