Jio Financial in Talks with Allianz: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा व्यवसाय तेलापासून ते कर्ज देण्यापर्यंत जगभरात पसरलेला आहे. पण आता ते विमा क्षेत्रातही उतरणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मुकेश अंबानींच्या विदेशी कंपनीसोबतच्या डीलबाबत चर्चा सुरू आहे. जर सर्व काही सुरळीत झाले तर मुकेश अंबानी या विदेशी कंपनीशी करार करतील आणि विमा क्षेत्रात एन्ट्री करतील.