Mukesh Ambani: मुकेश अंबानी बॉलीवूडवरही करणार राज्य; करण जोहरची कंपनी घेणार विकत, काय आहे पुढचा प्लॅन?

Mukesh Ambani: मुकेश अंबानी व्यावसायिक साम्राज्य झपाट्याने वाढवत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय आयटीपासून पेट्रोकेमिकल्सपर्यंत, ग्रीन एनर्जीपासून टेलिकॉमपर्यंत, रिटेलपासून फॅशनपर्यंत विस्तारलेला आहे.
Mukesh Ambani Karan Johar Dharma Productions
Mukesh Ambani Karan Johar Dharma Productions Sakal
Updated on

Mukesh Ambani: मुकेश अंबानी व्यावसायिक साम्राज्य झपाट्याने वाढवत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय आयटीपासून पेट्रोकेमिकल्सपर्यंत, ग्रीन एनर्जीपासून टेलिकॉमपर्यंत, रिटेलपासून फॅशनपर्यंत विस्तारलेला आहे. आता तो आपला व्यवसाय चित्रपट उद्योगापर्यंत वाढवत आहेत. मुकेश अंबानी यांची कंपनी बॉलीवूड धर्मा प्रोडक्शन विकत घेण्याची तयारी करत आहे.

इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरची कंपनी धर्मा प्रॉडक्शन विकत घेण्याची तयारी करत आहे. या करारामुळे, रिलायन्स चित्रपट क्षेत्रात विस्तार करेल. मात्र, धर्मा प्रॉडक्शनमध्ये किती भागभांडवल खरेदी करणार आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

Mukesh Ambani Karan Johar Dharma Productions
Bhavish Aggarwal: ओलाला आणखी एक झटका! ग्राहकांकडून घेतलेले पैसे बँक खात्यात परत करावे लागणार, CCPAने दिले आदेश

धर्मा प्रॉडक्शनची 90.7 टक्के मालकी करण जोहर आणि 9.24 टक्के मालकी त्याची आई हिरू जोहर यांच्याकडे आहे. अहवालानुसार, वाढता उत्पादन खर्च, कमी होत जाणारे थिएटरचे प्रमाण आणि ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता, यामुळे बॉलीवूड स्टुडिओसाठी आव्हाने उभी राहिली आहेत, ज्यामुळे नवीन गुंतवणूकीची गरज वाढत आहे.

रिलायन्स मनोरंजन कंपन्यांमधील गुंतवणुकीद्वारे मीडियातील उपस्थिती वाढविण्यावर भर देत आहे. यापूर्वी आरआयएलने बालाजीमध्ये काही प्रमाणात भागभांडवल विकत घेतले होते. धर्माबाबतही असेच प्रयत्न कंपनी करत आहे.

Mukesh Ambani Karan Johar Dharma Productions
Hyundai Motor India IPO: हुंडई मोटर इंडियाचा IPO 15 ऑक्टोबरला उघडणार; प्राइस बँड-लॉट साइजपासून ते GMP पर्यंत सर्व काही जाणून घ्या
जिओ स्टुडिओने FY24 मध्ये 700 कोटी कमावले

संभाव्य स्टेक खरेदीमुळे रिलायन्सच्या कंटेंट प्रोडक्शन पोर्टफोलिओला चालना मिळेल, ज्यामध्ये सध्या जिओ स्टुडिओ, वायाकॉम 18 स्टुडिओ, कोलोसियम मीडिया आणि बालाजीमधील काही स्टेकचा समावेश आहे.

Jio Studios ने FY24 मध्ये बॉक्स ऑफिसवर 700 कोटी रुपयांची कमाई केली. धर्मा प्रॉडक्शन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजकडून अशा कोणत्याही कराराबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.