Ladka Bhau Yojna 2024: बेरोजगार तरुणांना मिळणार 10,000 रुपये; 10 मिनिटात भरा ऑनलाईन अर्ज, स्टेप बाय स्टेप माहिती

Ladka Bhau Yojna 2024 Marathi News : शासनानं राज्यातील बेरोजगार तरुणांना १०,००० रुपयांपर्यंत मदत मिळवून देणारी एक योजना आणली आहे.
how to apply for ladka bhau yojna  2024
Ladka Bhau Yojna 2024 online apllication esakal
Updated on

Ladka Bhau Yojna all information in marathi: गरीब महिलांसाठी महाराष्ट्र शासनानं माझी लाडकी बहीण योजना आणली. याचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत. यानंतर शासनानं राज्यातील बेरोजगार तरुणांना १०,००० रुपयांपर्यंत मदत मिळवून देणारी एक योजना आणली आहे. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती.

'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' (CMYKPY) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधलं होतं. या योजनेसाठी एका मिनिटांत अर्ज भरता येणार आहे. याची स्टेबाय स्टेप माहिती घेऊयात.

how to apply for ladka bhau yojna  2024
Majha Ladka Bhau Yojana : ‘माझा लाडका भाऊ योजने’साठी आता तरुण रांगेत

काय आहे लाडका भाऊ योजना? (what is ladka bhau yojna)

राज्यातील बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणारी ही योजना असून याद्वारे १२ वी पास असलेल्या तरुणांना ६००० रुपये प्रति महिना, १२ वी पाससह डिप्लोमा धारकांना ८००० रुपये प्रति महिना तर ग्रॅज्युएशन किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण असलेल्या तरुणांना १०,००० रुपये प्रति महिना इतकं विद्यावेतन देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनासारखी ही थेट मदत नाही तर कौशल्ये शिकण्यासाठी आर्थिक मदत असणार आहे.

how to apply for ladka bhau yojna  2024
Ladka Bhau Yojana: 'लाडक्या भावां'साठी सरकारी तिजोरीवर येणार 5,500 कोटींचा भार; जाणून घ्या योजनेची वैशिष्ट्ये

लाडका भाऊ योजनेचे फायदे काय? (benefits of ladka bhau yojna)

  1. या योजनेसाठी पात्र असलेल्या तरुणांना कोणत्याही कंपनीत १ वर्षासाठी अॅप्रेंटिसशिप करावी लागेल.

  2. या काळात या तरुणांना स्टायपेंड अर्थात विद्यावेतन म्हणून ८,००० रुपये ते १०,००० रुपये प्रत्येक महिन्याला सरकारकडून मिळणार आहेत.

  3. ही स्टायपेंडची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा केली जाणार आहे.

  4. या योजनेद्वारे प्रत्येक वर्षी १० लाख बेरोजगार तरुणांना मोफत कौशल्ये प्रशिक्षण देणं हे लक्ष्य आहे.

  5. लाभार्थ्यांनी ज्या कंपनीत अॅप्रेंटशिप पूर्ण केली आहे, त्यांना त्याच कंपनीत नोकरीसाठी अर्ज देखील करता येणार आहे.

how to apply for ladka bhau yojna  2024
Ladka Bhau Yojana : ‘लाडक्या भावा’ला मिळणार विद्यावेतन;बारावी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी योजना

लाडका भाऊ योजनेला कोण पात्र असेल? (eligibility for ladka bhau yojna)

  1. या योजनेसाठी केवळ १८ ते ३५ वर्षे वयोगटातील असेच तरुणच पात्र ठरतील ज्यांच्याकडं कुठलाही रोजगार नाही.

  2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं डोमोसाईल असं गरजेचं आहे.

  3. यासाठी कमीत कमी १२ वी पास असणं गरजेचं आहे.

  4. या योजनेसाठी अर्ज केलेल्या तरुणांना शासनाच्या इतर कुठल्याही भत्ता योजनेचा लाभ मिळत नसावा.

  5. लाभार्थी तरुणाचं बँक खातं हे आधारशी लिंक असणं बंधनकारक आहे.

how to apply for ladka bhau yojna  2024
Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेची वयोमर्यादा वाढली, आता ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना मिळणार लाभ

लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुठल्या कागदपत्रांची गरज? (documents for ladka bhau yojna)

  1. आधार कार्ड

  2. अधिवास प्रमाणपत्र

  3. उत्पन्नाचा दाखला

  4. वयाचा दाखला

  5. शैक्षणिक प्रमाणपत्रे

  6. ई-मेल आयडी

  7. बँक खात्याचं पासबूक

  8. मोबाईल क्रमांक

  9. पासपोर्ट साईज फोटो

how to apply for ladka bhau yojna  2024
Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहिण' बरोबरच 'लाडका भाऊ' योजना पण आणा; ठाकरेंचं सरकारला आवाहन

लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा कराल? (how to apply for ladka bhau yojna)

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या रोजगार महास्वयं पोर्टवर जावं लागेल. यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

  1. https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या लिंकवर क्लिक करा

  2. लिंक ओपन झाल्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लीक करा

  3. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाईप करा आणि मोबाईलवर आलेल्या ओटीपीवरुन व्हिरिफिकेशन करा.

  4. यानंतर तुमच्यासमोर योजनेसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल

  5. फॉर्ममधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा

  6. माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे तिथेच अपलोड करा

  7. त्यानंतर शेवटी तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल

  8. यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी अर्थात युजर नेम आणि पासवर्ड मिळेल

  9. यानंतर लॉगिन करुन इतर माहिती भरा

  10. त्यानंतर पुन्हा तुमच्या मोबाईलवर व्हेरिफिकेशनचा ओटीपी येईल

  11. हा ओटीपी संबंधित ठिकाणी भरुन क्लीक करा, तुमचा अर्ज भरुन पूर्ण होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.