Skilled Workers: जगभरातील आर्थिक मंदीमुळे अनेक टेक कंपन्यांमधील कर्मचार्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. शेकडो कंपन्यांनी आपला खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. तर दुसरीकडे कुशल कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक कंपन्या टार्गेट पूर्ण करू शकत नाहीत.
जगभरातील सुमारे 64 टक्के टेक कंपन्यांना कुशल कामगारांची कमतरता भासत आहे. अमेरिकन डिजिटल मासिक एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूने भारताच्या एचसीएल टेकच्या सहकार्याने New approaches to the tech talent shortage हा अहवाल प्रकाशित केला आहे.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
या अहवालानुसार, कंपन्यांच्या सुमारे 56 टक्के अधिकाऱ्यांनी कुशल कामगारांची कमतरता असल्याचे सांगितले. तर किमान 31 टक्के अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की उमेदवारांमध्ये आवश्यक पात्रता नाही.
यापैकी केवळ 17 टक्के अधिकारी महाविद्यालयीन पदवी नसलेल्या उमेदवाराला नियुक्त करण्यास प्राधान्य देतात.
एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूचे जागतिक संचालक लॉरेल रूमा म्हणतात, उमेदवारांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांची प्रतिभा ओळखतो आणि त्यांना कामावर घेतो. यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण न केलेल्यांचाही समावेश आहे.
सर्वेक्षण केलेल्या सुमारे 32 टक्के कंपन्यांकडे नवीन कर्मचार्यांची भरती आणि प्रशिक्षण यासाठी कार्यक्रम आहेत. एचसीएल टेक ही भारतात अशा प्रकारचा कार्यक्रम राबवणाऱ्या पहिल्या कंपन्यांपैकी एक आहे.
TechBee नावाच्या कार्यक्रमाद्वारे, कंपनी श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूएस आणि कॅनडामधील कर्मचाऱ्यांची भरती करते.
कार्यक्रमांतर्गत, कंपनी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत काम करते आणि त्यांना प्रशिक्षण देते. या काळात विद्यार्थी आपला अभ्यास सुरू ठेवतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपन्या विद्यार्थ्यांना नोकरी देतात.
एमआयटी-एचसीएल टेकने अहवालात असे नमूद केले आहे की सुमारे 69 टक्के कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतात आणि त्यांना कामावर घेतात. 13 टक्के कंपन्या पुढील दोन वर्षांत असा कार्यक्रम वापरण्याची योजना आखत आहेत. असे अहवालात सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.