Coldplay Concert BookMyShow CEO: तुम्ही कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तिकिटे घेण्याचा प्रयत्न केला आहे का? खूप प्रयत्न करूनही तिकीट मिळालं नाही? एवढेच नाही तर सध्या उपलब्ध असलेल्या तिकिटांच्या किमतीही खूपच जास्त आहेत. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांना या तिकिटांचा काळाबाजार झाल्याचा संशय असल्याने त्यांनी ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्म 'बुक माय शो'च्या सीईओंना समन्स बजावला आहे.
‘बुक माय शो’ ची मालकी बिग ट्री एंटरटेनमेंटकडे आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचे सीईओ आशिष हेमराजानी आणि टीमच्या एका वरिष्ठ सदस्याला समन्स पाठवला आहे. मुंबईतील कोल्डप्लेच्या कॉन्सर्टच्या तिकिटांचा कथित काळाबाजार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना शनिवारी हजर राहण्यास सांगितले आहे.
ॲडवोकेट अमित व्यास यांनी तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी BookMyShow च्या सीईओला समन्स बजावली आहे. या तक्रारीत बुकिंग प्लॅटफॉर्मवर 19 ते 21 जानेवारी 2025 दरम्यान डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्यास यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी 2,500 मध्ये उपलब्ध असलेली तिकिटे आता 3 लाखांपर्यंत विकली जात आहेत. BookMyShow ने कोल्डप्ले चाहत्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि फसवणुकीच्या आरोपाखाली कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) व्यास यांचे स्टेटमेंट आधीच नोंदवले आहे आणि तिकिटांच्या काळाबाजारात गुंतलेल्या अनेक दलालांची ओळख पटवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून लवकरच आणखी लोकांना समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.