Viral Video: मुंबईच्या वडापाव विक्रेत्याचे उत्पन्न ऐकून कॉर्पोरेट लोकांना बसेल धक्का; सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

Vada Pav Seller Income: भारतातील बहुतांश लोक अजूनही महिन्याला एक लाख रुपये पगाराच्या स्वप्नापासून लांब आहेत. पण मुंबईत रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर वडापाव विकून एक व्यक्ती वर्षाला 24 लाख रुपये कमवत आहे.
Mumbai Vada Pav Seller Income Viral Video
Mumbai Vada Pav Seller Income Viral VideoSakal
Updated on

Mumbai Vada Pav Seller Income: भारतातील बहुतांश लोक अजूनही महिन्याला एक लाख रुपये पगाराच्या स्वप्नापासून लांब आहेत. पण मुंबईत रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर वडापाव विकून एक व्यक्ती वर्षाला 24 लाख रुपये कमवत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओतून ही माहिती समोर आली आहे. या व्हिडिओला सुमारे 1 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये वडा पाव विकणाऱ्या या रस्त्यावरील विक्रेत्याचे वार्षिक उत्पन्न 24 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

या विक्रेत्याची मासिक कमाई सुमारे 2.8 लाख रुपये आहे. यातून महिन्याला सुमारे 80 हजार रुपये खर्च होतात. यानंतर तो महिन्याला सुमारे 2 लाख रुपये कमावतो. त्याची कमाई ऐकून लोक हैराण झाले आहेत.

या व्हिडिओमुळे रस्त्यावरील फेरीवाल्यांची कमाई किती आहे हे लोकांना माहित झाले आहे. त्यामुळे पैसे कमावण्यासाठी जागतिक कंपनीच्या कार्यालयात बसण्याची गरज नाही हे लोकांच्या लक्षात येत आहे.

Mumbai Vada Pav Seller Income Viral Video
Veg Thali Cost: सर्वसामान्यांना मोठा धक्का! शाकाहारी थाळीच्या किमती 11 टक्क्यांनी वाढल्या; काय आहे कारण?
दररोज 9300 रुपये, मासिक कमाई 2.8 लाख रुपये

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वडापावची क्रेझ आहे. लोकांना हे स्ट्रीट फूड खूप आवडते. व्हिडिओमध्ये वडापाव विक्रेत्याने सांगितले की, सकाळीच आम्ही जवळपास 200 वडापाव विकतो.

संध्याकाळपर्यंत हा आकडा 622 वर जातो. तो एक वडा पाव 15 रुपयांना विकतो. अशाप्रकारे त्याचे रोजचे उत्पन्न सुमारे 9,300 रुपये होते. संपूर्ण महिन्यातील कमाईचा आकडा 2.8 लाखांच्या वर आहे.

Mumbai Vada Pav Seller Income Viral Video
पठ्ठ्यानं 31000 करोडला विकली कंपनी अन् कर्मचाऱ्यांना 40 कोटींचा फायदा, कोण आहेत तो भारतीय उद्योगपती?
व्हिडिओवर मजेशीर कमेंट

व्हिडिओवर एका यूजरने लिहिले की, आता मला समजत नाही की मी माझ्या आयुष्यात काय करत आहे. दुसऱ्याने लिहिले की, आता वेळ आली आहे की, मीही फूड कार्ट सुरू करण्याची. एका युजरने याला योग्य लोकेशनचा गेम म्हटले आहे. तसेच रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे लोक एवढी कमाई करत आहेत याचे लोकांना आश्चर्य वाटत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.