Mutual Fund: म्युच्युअल फंड उद्योगाची लक्षणीय कामगिरी; मालमत्तेत १९ टक्के वाढ

Mutual Fund: देशातील म्युच्युअल फंड उद्योगासाठी चालू वर्ष ब्लॉकबस्टर वर्ष ठरले असून, फंडांच्या मालमत्तेत नोव्हेंबरअखेर आतापर्यंतची सर्वाधिक १९ टक्के वाढ झाली आहे. असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (अॅम्फी) आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
mutual fund industry 19 percent increase in assets 37 lakh new investors
mutual fund industry 19 percent increase in assets 37 lakh new investors Sakal
Updated on

Mutual Fund: देशातील म्युच्युअल फंड उद्योगासाठी चालू वर्ष ब्लॉकबस्टर वर्ष ठरले असून, फंडांच्या मालमत्तेत नोव्हेंबरअखेर आतापर्यंतची सर्वाधिक १९ टक्के वाढ झाली आहे.

म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील सरासरी मालमत्ता २०२३ च्या ११ महिन्यांत आठ लाख कोटी रुपयांनी वाढून ४८.७५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (अॅम्फी) आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाने एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर या कालावधीत ३७.१६ लाख नवे गुंतवणूकदार जोडले. आर्थिक वर्ष २०२२-२३च्या याच कालावधीतील नव्या गुंतवणूकदारांच्या तुलनेत ३८ टक्के जास्त आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान जवळपास २७ लाख नवे गुंतवणूकदार जोडले होते. (mutual fund industry 19 percent increase in assets 37 lakh new investors)

देशातील वाढती आर्थिक साक्षरता, सुधारित उत्पन्न यामुळे म्युच्युअल फंडाकडे कल वाढत आहे. कोविड साथीच्या काळात लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्यामुळे शेअर बाजारातील परताव्याने नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित केले.

त्यामुळे प्रत्यक्ष शेअर बाजारात गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीला विशेषतः इक्विटी फंडातील योजनांना पसंती वाढली. या योजनांमध्ये कोविड साथीच्या सुरुवातीपासून २५ टक्क्यांपेक्षा अधिक चक्रवाढदराने वृद्धी झाली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी सिस्टीमॅटिक मंथली प्लॅन अर्थात ‘एसआयपी’ला सर्वाधिक प्राधान्य मिळत आहे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

गुंतवणूकदारांना महागाईशी सामना करण्यासाठी मोठा परतावा मिळविण्यासाठी रिअल इस्टेट, सोने आणि बँक ठेवी अशा पारंपरिक साधनांच्या मर्यादा लक्षात आल्या आहेत.

तसेच म्युच्युअल फंडांच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढत आहे आणि तरुण व्यावसायिक आता संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक आकांक्षा साध्य करण्यासाठी या पर्यायावर भर देत आहेत, यामुळे या उद्योगाची उल्लेखनीय प्रगती झाली आहे.

भांडवली बाजारातील गुंतवणूकही वाढत आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारही मजबूत होत आहेत. त्यामुळे परिस्थिती पोषक ठरत आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

mutual fund industry 19 percent increase in assets 37 lakh new investors
Crypto Firms: नऊ विदेशी क्रिप्टो कंपन्यांना सरकारने पाठवली नोटीस; काय आहे प्रकरण?

हे वर्ष या उद्योगासाठी एक टर्निंग पॉईंट ठरले असून, या क्षेत्रातील वाढीच्या संधीमुळे नव्या कंपन्यांही आकर्षित होत आहेत. यंदा बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंड, हेलिओस म्युच्युअल फंड अशा अनेक बड्या कंपन्यांनी प्रवेश केला.

त्यामुळे देशातील एकूण फंड कंपन्यांची संख्या ४४ वर गेली आहे. साधी, पारदर्शक आणि परवडणारी उत्पादने आणल्यास सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग वाढण्याची प्रचंड संधी आहे, असे झेरोधा फंड हाऊसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जैन यांनी म्हटले आहे.

mutual fund industry 19 percent increase in assets 37 lakh new investors
Ram Mandir: राम मंदिरामुळे व्यापाराला चालना; ५० हजार कोटींची उलाढाल होण्याचा ‘सीएआयटी’चा अंदाज

मालमत्ता गेल्या दहा वर्षांत दुप्पट

भारतीय फंडांद्वारे व्यवस्थापित केलेला पैसा दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थेच्या आकारमानाच्या सुमारे १६ टक्के असून, गेल्या दहा वर्षांत हे प्रमाण दुप्पट झाले आहे, तरीही, १.४ अब्ज लोकसंख्येच्या देशात केवळ चार कोटी म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आहेत.

त्यामुळे या क्षेत्रात वाढीला मोठी संधी असल्याचे ‘सेबी’चे सदस्य अमरजीत सिंग यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.