म्युच्युअल फंडांची AUM प्रथमच 50 लाख कोटी पार, SIP गुंतवणूक देखील 17,610 कोटींच्या विक्रमी उच्चांकावर

Mutual Fund: डिसेंबर 2023 मध्ये भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) 50 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. एयूएम वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेअर बाजारातील वाढ आणि फंडांच्या गुंतवणुकीत झालेली वाढ.
Mutual fund Monthly net AUM above Rs 50 lakh crore mark for first time; SIP inflows at record Rs 17,610 crore
Mutual fund Monthly net AUM above Rs 50 lakh crore mark for first time; SIP inflows at record Rs 17,610 crore Sakal
Updated on

Mutual Fund: डिसेंबर 2023 मध्ये भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) 50 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. एयूएम वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेअर बाजारातील वाढ आणि फंडांच्या गुंतवणुकीत झालेली वाढ.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया (AMFI) च्या डेटानुसार, डिसेंबरमध्ये ओपन-एंडेड स्कीम्स अंतर्गत व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता 50.80 लाख कोटी रुपये होती, तर नोव्हेंबर 2023 मध्ये हा आकडा 48.78 लाख कोटी रुपये होता.

गेल्या वर्षी शेअर बाजारातील प्रचंड वाढीचा परिणाम म्युच्युअल फंड उद्योगाच्या मालमत्तेवर दिसून येत आहे. डिसेंबर 2023मध्ये सेन्सेक्स 7.53 टक्क्यांनी वाढला, तर निफ्टी निर्देशांक 7.93 टक्क्यांनी वाढला. दरम्यान सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मधील गुंतवणूक डिसेंबरमध्ये वाढून 17,160 कोटी झाली आहे, जी मागील महिन्यात 17,073 कोटी होती.

Mutual fund Monthly net AUM above Rs 50 lakh crore mark for first time; SIP inflows at record Rs 17,610 crore
Tax Evasion: 29,273 बनावट कंपन्यांनी केली 44,000 कोटी रुपयांची करचोरी; 121 जणांना अटक

ओपन-एंडेड इक्विटी म्युच्युअल फंडातील निव्वळ प्रवाह नोव्हेंबरमध्ये 15,536 कोटींच्या तुलनेत डिसेंबरमध्ये 9 टक्क्यांनी वाढून 16,997 कोटींवर पोहोचला आहे. याच महिन्यात स्मॉलकॅप फंडांमध्ये निव्वळ गुंतवणूक 3,858 कोटी रुपये होती, तर मिडकॅप फंडांमध्ये ती 48 टक्के कमी झाली आहे.

Mutual fund Monthly net AUM above Rs 50 lakh crore mark for first time; SIP inflows at record Rs 17,610 crore
Budget 2024: शेतकऱ्यांसाठी सरकार करणार मोठी घोषणा; पीएम किसान योजनेचे पैसे वाढवण्याची शक्यता

नोव्हेंबरमध्ये स्मॉलकॅप फंडांमध्ये निव्वळ ओघ 3,699 कोटी होता, तर मिडकॅप फंडांमध्ये निव्वळ ओघ 2,666 कोटी होता. संबंधित कालावधीत लार्जकॅप फंडांमध्ये निव्वळ गुंतवणूक 307 कोटी होती. इक्विटी-आधारित म्युच्युअल फंडांमधील प्रवाह नोव्हेंबरमध्ये 22 टक्के कमी झाला. डिसेंबरमध्ये डेट फंडातील निव्वळ गुंतवणूक 1,505 कोटी रुपये होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.