Mutual Funds: गुंतवणूकदार असोत किंवा बाजारातील तज्ज्ञ असोत, त्यांचा सल्ला असा असतो की, बाजारात दीर्घकाळ गुंतवणुक केली पाहिजे. देशातील काही जुन्या इक्विटी म्युच्युअल फंड योजनांचा परतावा पाहिल्यावर हीच गोष्ट समोर येते. 30 ते 37 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या म्युच्युअल फंड योजनांवर एक नजर टाकूया ज्यांनी या काळात दुहेरी अंकी परतावा दिला आहे.
ओल्ड इज गोल्ड ही जुनी म्हण भारतातील पहिल्या इक्विटी स्कीम UTI मास्टर शेअर फंडच्या बाबतीत लागू होते. ऑक्टोबर 1986 मध्ये सुरू झालेल्या या योजनेला 37 वर्षे पूर्ण होत आहेत.
देशातील काही इक्विटी म्युच्युअल फंड योजनांनी नुकतीच 30 वर्षे पूर्ण केली आहेत, तर काही योजनांना 30 वर्षे पूर्ण होणार आहेत. येथे 1993 च्या अखेरीस सुरू केलेल्या 6 इक्विटी योजनांची माहिती दिली आहे, ज्यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा दिला आहे.
1. UTI मास्टर शेअर फंड
कॅटेगरी : इक्विटी लार्जकॅप
यूटीआय मास्टर शेअर फंड 1986 मध्ये सुरू करण्यात आला. ही योजना सुमारे 37 वर्षे जुनी आहे. लाँच झाल्यापासून, त्याचा परतावा वार्षिक 17% पेक्षा जास्त आहे.
लाँच तारीख: ऑक्टोबर 18, 1986
लाँच झाल्यापासून परतावा: 17.09% वार्षिक
किमान गुंतवणूक: 100 रु
किमान SIP: रु 500
एकूण मालमत्ता: रु. 10,900 कोटी (31 मे 2023 पर्यंत)
पोर्टफोलिओमधील टॉप शेअर्स: ICICI बँक, HDFC, इन्फोसिस, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक
2. एसबीआय मॅग्नम इक्विटी ESG फंड
कॅटेगरी: इक्विटी थीमॅटिक ESG
SBI मॅग्नम इक्विटी ESG फंड 1991 मध्ये सुरू करण्यात आला. ही योजना सुमारे 32 वर्षे जुनी आहे.
लाँच तारीख: 1 जानेवारी 1991
लाँच झाल्यापासून परतावा: 14.74% वार्षिक
किमान गुंतवणूक: रु 1,000
किमान SIP: रु 1,000 मासिक
एकूण मालमत्ता: रु 4747 कोटी (31 मे 2023 पर्यंत)
पोर्टफोलिओमधील टॉप शेअर्स: TCS, Infosys, ICICI बँक, HDFC, Axis Bank
3. टाटा लार्ज आणि मिडकॅप फंड
कॅटेगरी: लार्जआणि मिडकॅप
टाटा लार्ज अँड मिडकॅप फंड 1993 मध्ये सुरू करण्यात आला. या जवळपास 30 वर्ष जुन्या फंडाने लाँच झाल्यापासून सुमारे 13% वार्षिक परतावा दिला आहे.
लाँच तारीख: मार्च 31, 1993
लाँच झाल्यापासून परतावा: 12.80% वार्षिक
किमान गुंतवणूक: रु 5,000
किमान SIP: रु 1,000 मासिक
एकूण मालमत्ता: रु 4,348 कोटी (31 मे 2023 पर्यंत)
पोर्टफोलिओमधील टॉप शेअर्स: ICICI बँक, वरुण बेव्हरेजेस, RIL, HDFC बँक, SBI
4. SBI लार्ज आणि मिडकॅप फंड
कॅटेगरी: लार्ज आणि मिडकॅप
SBI लार्ज अँड मिडकॅप फंड 1993 मध्ये सुरू करण्यात आला. या जवळपास 30 वर्ष जुन्या फंडाने लाँच झाल्यापासून 14% पेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे.
लाँच तारीख: फेब्रुवारी 28, 1993
लाँच झाल्यापासून परतावा: 14.66% वार्षिक
किमान गुंतवणूक: रु 5,000
किमान SIP: रु 500 मासिक
एकूण मालमत्ता: रु. 11,431 कोटी (31 मे 2023 पर्यंत)
पोर्टफोलिओमधील टॉप शेअर्स: ICICI बँक, HDFC बँक, इन्फोसिस, ITC, SBI
5. फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंड
कॅटेगरी: लार्जकॅप
फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंड 1993 मध्ये सुरू करण्यात आला. या फंडाने लाँच झाल्यापासून दरवर्षी 19% दराने परतावा दिला आहे.
लाँच तारीख: डिसेंबर 1, 1993
लाँच झाल्यापासून परतावा: 19% वार्षिक
किमान गुंतवणूक: रु 5,000
किमान SIP: रु 500 मासिक
एकूण मालमत्ता: रु. 6,521 कोटी (31 मे 2023 पर्यंत)
पोर्टफोलिओमधील टॉप शेअर्स: ICICI बँक, HDFC बँक, रिलायन्स, इन्फोसिस, HDFC
6. SBI लाँग टर्म इक्विटी फंड
कॅटेगरी: ELSS (Equity Linked Savings Schemes)
SBI लाँग टर्म इक्विटी फंड हा कर बचत करणारा फंड आहे, जो 1993 मध्ये लाँच झाला होता. 30 वर्षे पूर्ण केलेल्या फंडाने लाँच झाल्यापासून 16% पेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे.
लाँच तारीख: मार्च 31, 1993
लाँच झाल्यापासून परतावा: 16.19% वार्षिक
किमान गुंतवणूक: 500 रु
किमान SIP: रु 500 मासिक
एकूण मालमत्ता: रुपये 13,538 कोटी (31 मे 2023 पर्यंत)
पोर्टफोलिओमधील टॉप शेअर्स: ICICI बँक, L&T, कमिन्स इंडिया, रिलायन्स, भारती एअरटेल
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.