इनोव्हेशन म्हणजे भविष्याची चांगली कल्पना करणे आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी नव्या संकल्पना अंमलात आणणे. जगभरातील कंपन्या, उज्ज्वल उद्यासाठी अत्याधुनिक नवकल्पनांमध्ये व्यस्त आहेत.
त्या गुंतवणूकदारांना नाविन्यपूर्ण दृष्टिकोन असलेल्या कंपन्यांमधील वाढीच्या संभाव्यतेचा उपयोग करण्याची संधी देते. तथापि, सामान्य गुंतवणूकदारांसाठी या संधी वेळेपूर्वी शोधणे आणि त्यात गुंतवणूक करणे हे एक आव्हानात्मक काम असू शकते. येथेच अशा नवोपक्रमाशी संबंधित कंपन्यांमधील गुंतवणुकीची संधी देणारे थीमॅटिक म्युच्युअल फंड मदतीला येतात.
पारंपरिक विचारसरणी नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणजे तंत्रज्ञान अशी व्याख्या करते. हे खरे नाही. नावीन्यपूर्ण संकल्पना किंवा नवोपक्रम हे शुन्याचा शोध, चाकांचा शोध इथपासून ते अवकाश पर्यटनाची कल्पना प्रत्यक्षात आणण्यापर्यंत किंवा डीएनएची पुनर्रचना करण्याइतके साधे, तरीही गहन असू शकते. थोडक्यात, नवोपक्रमाची व्याप्ती व्यापक असते आणि ती विशिष्ट क्षेत्रांपुरती मर्यादित नसते.
उदाहरणार्थ, संथ गतीने चालणाऱ्या लोकोमोटिव्हपासून हायस्पीड वंदे-भारत रेल्वेपर्यंतचा नाविन्यपूर्ण प्रवास आपल्या डोळ्यांसमोर आहे. स्टीम इंजिन, टेलिफोन, ऑटोमोबाईल, वीज, संगणक, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एनर्जी स्टोअरेज, रोबोटिक्स, ब्लॉकचेन, हे सगळे गेल्या दोन-तीन शतकांतील नवनिर्मितीचे टप्पे आहेत. नवोपक्रम ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे आणि पुढे जाणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे.
ढोबळपणे, इनोव्हेशन तीन प्रकारचे असते. मूलगामी, विघटनकारी आणि व्यापक. विद्यमान उत्पादनाच्या जागी नवे आणि चांगले उत्पादन आणणे, मोठ्या ग्राहकांना परवडणारी नवी उत्पादने आणणे किंवा विद्यमान उत्पादने आणि सेवांमध्ये सुधारणा करणे. भागधारकांसाठी उच्च मूल्य निर्माण करताना व्यवसाय अधिक कार्यक्षम, वाढ-केंद्रित बनवते. त्याचा लाभ गुंतवणूकदारांना होतो.
आयसीआयसीआय प्रु. इनोव्हेशन फंड
हा एक ओपन-एंडेड इक्विटी फंड आहे. गुंतवणूकदारांना नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारीत उत्पादनांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक योग्य संधी देते. ही योजना तिच्या मालमत्तेपैकी ८० टक्के नाविन्यपूर्ण दृष्टिकोन असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवते.
आपल्या पोर्टफोलिओमध्ये मूल्यवर्धन करण्यासाठी आणखी एक परिमाण म्हणून नावीन्य जोडून संपत्ती निर्माण करू पाहणारे गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात.
(लेखक पारस प्राइम वेल्थ प्रा. लि.चे सीईओ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.