Narayana Murthy: आयटी कंपनीचे सह-संस्थापक नारायण मूर्ती त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. इन्फोसिसचे नेतृत्व पुढच्या पिढीकडे सोपवल्यानंतर, आजकाल ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोकांसोबत त्यांचे अनुभव शेअर करत आहेत.
अशाच एका कार्यक्रमात नारायण मूर्ती यांनी 12 वर्षाच्या मुलाला त्यांच्यासारखे बनू नका असा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की- तुम्ही माझ्यासारखे व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही माझ्यापेक्षा चांगले व्हा आणि देशासाठी काहीतरी चांगल करा अशी माझी इच्छा आहे.