Saving Scheme For Women : मोदी सरकारने खास महिलांसाठी सुरू केली आहे बचत योजना, तुम्हाला माहितीये?

बचतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून खास महिलांसाठी मोदी सरकारने ही योजना सुरु केली आहे.
Saving Scheme For Women
Saving Scheme For Womenesakal
Updated on

Modi Government Started Saving Scheme For Women :

बचतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून खास महिलांसाठी मोदी सरकारने ही योजना सुरु केली आहे. ही योजना गेल्या अर्थसंकल्पात सुरु करण्यात आली आहे. ही योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या योजनेचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आहे.

या योजनेत फक्त महिलाच पैसे जमा करू शकतात. मुली आणि विवाहित महिला यात गुंतवणूक करू शकतात. देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही या योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकतात. जाणून घेऊया त्याविषयी.

महिला सन्मान बचत योजना

  • अल्पवयीन मुलींच्या नावाने मुली, महिला आणि त्यांचे महिला पालक हे महिला सन्मान बचत योजनेत गुंतवणूक करू शकतात.

  • सध्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत ७.५ टक्के व्याज दिले जात आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात किमान १००० रुपयांची गुंतवणूक करता येते.

  • यानंतर १००० रुपयांच्या पटीत जास्तीत जास्त २ लाख रुपये जमा करता येतील.

  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात जमा केलेले पैसे आवश्यक असल्यास ६ महिन्यांनंतर काढता येतात.

  • मात्र त्याला व्याजाच्या स्वरुपात २ टक्के तोटा सहन करावा लागणार आहे.

Saving Scheme For Women
PM Modi Pune Schedule: 'दगडूशेठ दर्शन ते मेट्रो उद्घाटन', जाणून घ्या मोदींच्या पुणे दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केवायसी करावे लागेल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन आणि आधार क्रमांक द्यावा लागेल.

  • जर १० हजार रुपये महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात गुंतवले तर २ वर्षानंतर ११,६०२ रुपये मिळतील.

  • जर या योजनेत १ लाख रुपये गुंतवले तर २ वर्षानंतर तुम्हाला सुमारे १ लाख १६ हजार रुपये मिळतील.

  • यात जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास २ वर्षांनंतर सुमारे २.३२ लाख मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.