आजच्या काळात अनेक खर्च वाढत आहेत. तसेच,अपघात आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे खर्च दुप्पट होत आहेत. या खर्चाला तोंड देण्यासाठी विमा हा एक चांगला पर्याय आहे. असा विचार करा की एखाद्या व्यक्तीचा अपघातात हात मोडला गेला असेल.
परंतु जेव्हा तो रुग्णालयात पोहोचेल तेव्हा त्याला कळले की त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे, तेव्हा उपचारासाठी दोन ते तीन लाख रुपये खर्च येऊ शकतो. जर त्या व्यक्तीकडे आरोग्य विमा नसेल तर त्याला हा सर्व खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागेल.
एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी २ – ३ लाख रूपये उभे करणे सोप्पी गोष्ट नाही. त्या अपघातासाठी मनाची आणि खिशाची केलेली तयारी म्हणजे विमा होय. आज National Insurance awareness day आहे. त्यानिमित्तानेच आपण भारतात विमा कंपनीची सुरूवात अन् विमा निवडताना काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती घेणार आहेत. (National Insurance Awareness Day 2024)
युरोपियन लोकांनी कोलकाता येथे ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी सुरू केली. भारतीय भूमीवर पहिल्या विमा कंपनीचा हा पाय रोवला होता. त्या काळात स्थापन झालेल्या सर्व विमा कंपन्या युरोपीय समुदायाच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने एकत्र आणल्या गेल्या. या कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचा विमा उतरवण्यास तयार नव्हत्या.
पुढे मुट्टी लाल सील यांसारख्या प्रतिष्ठित लोकांच्या प्रयत्नाने परदेशी आयुर्विमा कंपन्यांनी भारतीय लोकांच्या जीवनाचा विमा काढण्यास सुरुवात केली. परंतु प्रीमियमची रक्कम युरोपियन लोकांपेक्षा भारतीयांकडून जास्त वसूल केली जात होती. त्यानंतर बॉम्बे म्युच्युअल लाइफ ॲश्युरन्स सोसायटीने १८७० साली पहिली भारतीय जीवन विमा कंपनी सुरू केली. (Insurance)
पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला जोखीम लक्षात ठेवावी लागेल. असे काही धोके आहेत जे कधीही येऊ शकतात. या गोष्टी लक्षात घेऊन जर आपण विमा घेतला तर भविष्यातील समस्यांना आपण सहज सामोरे जाऊ. तुमच्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तुमची काळजी कशी घेतली जाईल याचा आधी विचार करावा.
भविष्यात मुलांच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्चही लक्षात ठेवायला हवा. घरातील कोणी अचानक आजारी पडल्यास खर्च आणि वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान होण्याची भीतीही अनेकदा सतावत असते. अनेक धोके असू शकतात. पण त्यांची आधीच काळजी घेतली तर आपले भविष्य चांगले होऊ शकते.
विमा कंपन्या आम्हाला अनेक कागदपत्रे देतात, ज्यामध्ये पॉलिसीची संपूर्ण माहिती लिहिलेली असते. पण आपण ते वाचत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही नकळत कंपनीची काही अट किंवा गोष्ट स्वीकारता ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.
त्यामुळे कोणतीही विमा योजना खरेदी करण्यापूर्वी पॉलिसीशी संबंधित कागदपत्रे नेहमी काळजीपूर्वक वाचा. याशिवाय, केवळ प्रीमियम स्वस्त आहे म्हणून आम्ही पॉलिसी निवडू नये. पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी कंपनीची कामगिरीही तपासली पाहिजे.
या सर्व प्रकारच्या जोखमींना तोंड देण्यासाठी बाजारात अनेक पॉलिसी येतात. आम्ही आमच्या गरजेनुसार कोणतीही पॉलिसी घेऊ शकतो. यामध्ये जीवन विमा, आरोग्य विमा, वैयक्तिक अपघात आणि अपंगत्व विमा, वाहन विमा, गृह विमा, प्रवास विमा, परदेशी वैद्यकीय विमा इ. होय.
आरोग्य विमा फक्त वृद्ध आणि आजारी लोकांसाठी आहे? असे तुम्हालाही वाटत आहे का? तर मग तुम्ही कधी वेगवेगळ्या आजारांचा विचार केला नसेल. आजारांसाठी विमा संरक्षण एक वरदान ठरू शकते आणि हॉस्पिटलच्या अनपेक्षित खर्चामध्ये तुमचा सर्व ताण दूर करू शकते? तुमच्या गंभीर आजाराचे बिल स्वतःच्या खिशातून भरण्यापेक्षा विमा हा एक चांगला पर्याय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.