Mazagon Dock Shipbuilders Ltd : माझगाव डॉक शिपबिल्डर्सला नवरत्नचा दर्जा, नवरत्न दर्जा असणे म्हणजे काय ?

नवरत्न कंपनी म्हणून, माझगाव डॉक केंद्र सरकारची मंजुरी न घेता 1000 कोटींपर्यंत गुंतवणूक करू शकते.
Mazagon Dock Shipbuilders Ltd
Mazagon Dock Shipbuilders Ltd Sakal
Updated on

माझगाव डॉक शिपबिल्डर्स (Mazgaon Dock Shipbuilders) या युद्धनौका आणि पाणबुड्या बनवणाऱ्या आघाडीच्या सरकारी कंपनीला नवरत्नचा दर्जा मिळाला आहे. कंपनीने मंगळवारी आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली.

नवरत्न दर्जा मिळवणारी ही देशातील 18वी पीएसयू आहे. अलीकडेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच IREDA ला देखील नवरत्नचा दर्जा मिळाला आहे. माझगाव डॉक शेअर्समध्ये यानंतर 0.31 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आणि सध्या बीएसईवर हा शेअर 3976.55 रुपयांवर ट्रेड करत आहे.

नवरत्न दर्जा मिळाल्यानंतर, माझगाव डॉक ही इंजिनियर्स इंडिया, भारतीय कंटेनर निगम लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एअरोनॉटिक्स, आरसीएफ, नाल्को, एनएमडीसी, आरवीएनएल, IRCON आणि आयआरईडीए सारख्या कंपन्यांच्या लिस्टमध्ये सामील झाले.

नवरत्न कंपनी म्हणून, माझगाव डॉक केंद्र सरकारची मंजुरी न घेता 1000 कोटींपर्यंत गुंतवणूक करू शकते. या कंपन्यांना त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी 30% पर्यंत गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य एका वर्षात आहे, पण ते 1,000 कोटींच्या आत राहिले पाहिजे. नवरत्न कंपन्यांना जॉईंट व्हेंचर, अलायंस आणि परदेशात सब्सिडियरी स्थापन करण्याची परवानगी आहे.

नवरत्न कंपनी होण्यासाठी, पीएसयूला प्रथम मिनीरत्न कंपनी असणे आवश्यक आहे. याशिवाय, त्यांनी सलग तीन वर्षांसाठी 5,000 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला पाहिजे आणि तीन वर्षांसाठी 25,000 कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल राखली पाहिजे किंवा तीन वर्षांसाठी 15,000 कोटींहून अधिक वार्षिक निव्वळ संपत्ती असणे आवश्यक आहे.

माझगाव डॉकने आर्थिक वर्ष 2024 साठी 9,466 कोटींची वार्षिक उलाढाल नोंदवली. या वर्षी एप्रिलमध्ये IREDA ला डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्रायझेसद्वारे नवरत्नचा दर्जा प्रदान करण्यात आला. कंपनीने आता 2030 पर्यंत महारत्न कंपनी बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे शेअर्स 2024 मध्ये आतापर्यंत 74 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 12 महिन्यांत शेअरची किंमत तिप्पट होऊन 216% झाली आहे. या वाढीनंतर, आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या विश्लेषकाने स्टॉकवर 'सेल' रेटिंग आणि 900 रुपयांची टारगेट प्राइस कायम ठेवली, जी सध्याच्या पातळीपासून 70 टक्क्यांहून अधिक घट दर्शवते. मार्च तिमाहीत 84.8% च्या स्टेकसह सरकार अजूनही कंपनीतील सर्वात मोठे भागधारक आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.