Gold Festive Offers: नवरात्रीत सोन्याच्या दागिन्यांवर मिळतेय मोठी सवलत, जाणून घ्या कोण देतंय किती सूट?

Festive Offers: ऑनलाइन आणि ऑफलाइन सोने खरेदी करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
navratri Gold Festive Offers  tanishq to senco gold check details
navratri Gold Festive Offers tanishq to senco gold check details Sakal
Updated on

Festive Season Offers: देशात सणासुदीला सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये मालमत्ता, वाहने आणि सोन्याचे दागिने यांची बरीच खरेदी होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, काही मोठ्या ज्वेलरी ब्रँड्सने या नवरात्रीमध्ये दमदार ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

अशा वेळी सोने खरेदी केल्यास तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. या ऑफर्समध्ये मेकिंग चार्जेसवर सवलत, दागिने बदलण्यावर सवलत अशा ऑफर ग्राहकांसाठी जाहीर केल्या आहेत.

तनिष्कने या फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. 15 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2023 पर्यंत तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन सोने खरेदी करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

या नवरात्रीला तनिष्क सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 20 टक्के सूट देत आहे. तनिष्क हिऱ्यांच्या दागिन्यांवरही सूट देत आहे. तुम्ही 12 नोव्हेंबरपर्यंत खरेदी केल्यास, तुम्हाला हिऱ्यांचे दागिने खरेदीवर एकूण किंमतीवर 20 टक्के सूट मिळणार आहे.

navratri Gold Festive Offers  tanishq to senco gold check details
Lemon Tree Share: शेअर बाजारात घसरण, पण लेमन ट्री शेअर्समध्ये तुफान तेजी, काय आहे कारण?

सेन्को गोल्ड अँड डायमंडने नुकतेच ‘गॉसिप’ कलेक्शन सादर केले. या कलेक्शन अंतर्गत ऑफर केलेल्या दागिन्यांच्या ऑनलाइन खरेदीवर कंपनीने ‘Buy 3 Get 1 Free’ ऑफर जाहीर केली आहे. याशिवाय कंपनी चांदीच्या दागिन्यांवर 10 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे.

navratri Gold Festive Offers  tanishq to senco gold check details
SBI Card: एसबीआय कार्डने फेस्टिव्ह ऑफरची केली घोषणा, 27.5% पर्यंत मिळेल कॅशबॅक, किती दिवस आहे ऑफर?

मलबार गोल्ड आणि डायमंडने देखील नवरात्रीची ऑफर जाहीर केली आहे. हा ब्रँड फक्त ऑनलाइन खरेदीवर सूट देत आहे. आता तुम्ही 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने विकत घेतल्यास, तुम्हाला 100 मिलीग्राम सोन्याचे नाणे मोफत दिले जाईल.

दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 30 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. या सर्व ऑफर्सचा लाभ 14 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत वैध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.