Changes in Credit Card Rules : अनेक बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांनी मे 2024 मध्ये क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले आहेत. तुम्हीही क्रेडिट कार्डचे ग्राहक असाल तर तुम्हाला या बदलांची माहिती असायला हवी. काही बँका आणि कंपन्यांनी क्रेडिट कार्डशी संबंधित शुल्क आणि नियम बदलले आहेत. बँक ऑफ बडोदा, येस बँक, आयडीबीआय बँक आणि एचडीएफसी बँक या बँकांनी या महिन्यात त्यांचे क्रेडिट कार्ड नियम बदलले आहेत.
तुम्ही जर स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या क्रेडिट कार्डच्या कॅशबॅकमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल 21 जून 2024 पासून लागू होतील.
21 जूनपासून मिळालेला कोणताही कॅशबॅक स्विगी मनीऐवजी क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये दिसून येईल. याचा अर्थ कॅशबॅकमुळे पुढील महिन्याचे स्टेटमेंट शिल्लक कमी होईल. अशा प्रकारे तुमचे बिल कमी होईल.
आयडीएफसी फर्स्ट बँकेने म्हटले आहे की युटिलिटी बिलांसाठी क्रेडिट कार्ड पेमेंटची एकूण रक्कम 20,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास ते 1 टक्के आणि जीएसटी अतिरिक्त शुल्क आकारेल.
स्टेटमेंट सायकलमध्ये तुमचे युटिलिटी बिल व्यवहार (गॅस, वीज आणि इंटरनेट) रुपये 20,000 किंवा त्यापेक्षा कमी असल्यास कोणतेही अधिभार लागणार नाही. फर्स्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड, एलआयसी क्लासिक क्रेडिट कार्ड आणि एलआयसी सिलेक्ट क्रेडिट कार्डवर युटिलिटी अधिभार लागू होणार नाही.
बँक ऑफ बडोदाने त्यांच्या BOBCARD One सह-ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील व्याज दर आणि विलंब शुल्कात वाढ केली आहे. वाढलेले दर 26 जून 2024 पासून लागू होतील.
येस बँकेने ‘प्रायवेट’ क्रेडिट कार्ड वगळता त्यांच्या सर्व क्रेडिट कार्डमध्ये सुधारणा केली आहे. हे बदल केवळ बँकेच्या विशिष्ट क्रेडिट कार्ड प्रकारांवरील इंधन शुल्कावर असणार आहेत. युटिलिटी व्यवहारांसाठी अतिरिक्त शुल्काच्या अटींमध्येही बदल करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.