Tomato Price: टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी चक्क अर्थमंत्र्यांचा पुढाकार, थेट नेपाळहून...

Tomato Price: देशभरात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. याच संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे
nirmala sitaraman
nirmala sitaramanesakal
Updated on

नवी दिल्ली- देशभरात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. याच संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारने नेपाळकडून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मला सीतारामण यांनी बुधवारी संसदेत याबाबतची माहिती दिली. केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी इतरही पावलं उचलली आहेत, असं त्या म्हणाल्या. (Latest Marathi News )

निर्मला सीतारामण अविश्वास प्रस्तावावर बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी हे लोकांना दिलेला शब्द पाळत आहेत. त्यामुळे गरिबांचे स्वप्न सत्त्यात उतरत आहे. मिळेल पासून मिळाले, बनेल आणि बनवले आणि येईल पासून आले असे रुपातंरण मोदी सरकारच्या काळात झाले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात केवळ आश्वासने दिली जायची, पण मोदी सरकारच्या काळात सर्व आश्वासने पूर्ण करण्यात आले आहेत. (NEW DELHI Finance minister Nirmala Sitharaman on tomato rate Lok Sabha parliament)

nirmala sitaraman
PM Modi in Parliament: लांबलेले भाषण, विरोधकांचा सभात्याग.. अखेर मोदी मणिपूरवर बोलले

निर्मला सीतारामण यांनी संसदेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं.गेल्या नऊ वर्षात देशाने मोठे बदल पाहिले आहेत. याकाळातच सगळ्यात जास्त विकास पाहायला मिळाला. नऊ वर्षांपूर्वी आपली अर्थव्यवस्था कमकुवत होती, पण आता आपली अर्थव्यवस्था सगळ्यात जास्त गतीने वाढत आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. देशभरातील गावात वीज पुरवठा करण्यात आलाय, जवळपास सर्व लोकांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. तसेच आता स्वस्तामध्ये ओषधी लोकांना मिळू लागली आहेत, असं म्हणत अर्थ मंत्र्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले.

nirmala sitaraman
काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO; शाळेतून घरी परतणाऱ्या मुलीवर गाईचा हल्ला

निर्मला सीतारामण यांनी जवळपास एक तास सभागृहात भाषण केले. यावेळी त्यांनी यूपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यूपीए सरकारने संपूर्ण दशक वाया घातला, पण आता देश प्रगती करत आहे. देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे, तसेच महागाईचा दरही नियंत्रणात आहे. दिल्लीमध्ये टोमॅटोचे दर १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटकमधून टोमॅटो खरेदी करण्यात आले आहेत. सबसिडीमध्ये टोमॅटो दिल्लीमध्ये देण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी संसदेत दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.