KEC International: केईसी इंटरनॅशनलला 1422 कोटीची नवी ऑर्डर, शेअर्समध्ये मजबूत तेजी...

केईसी इंटरनॅशनलचे (KEC International) शेअर्स नुकतेच दोन टक्क्यांहून अधिक वाढले. सध्या एनएसईवर हा शेअर 1.42 टक्क्यांच्या वाढीसह 893 रुपयांवर ट्रेड करत आहे.
new order worth 1422 crores to KEC International strong rise in shares
new order worth 1422 crores to KEC International strong rise in sharesSakal
Updated on

केईसी इंटरनॅशनलचे (KEC International) शेअर्स नुकतेच दोन टक्क्यांहून अधिक वाढले. सध्या एनएसईवर हा शेअर 1.42 टक्क्यांच्या वाढीसह 893 रुपयांवर ट्रेड करत आहे. खरं तर, कंपनीला भारत आणि अमेरिकेतील ट्रांसमिशन आणि डिस्ट्रीब्यूशन प्रोजेक्ट्ससाठी 1422 कोटीच्या नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत.

या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 22875 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 968.20 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 551 रुपये आहे.

केईसी इंटरनॅशनलने पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून (PGCIL) भारतातील 765 kV आणि 400 kV ट्रान्समिशन लाईन्ससाठी काँट्रॅक्ट मिळवला आहे. याव्यतिरिक्त, कंपनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये (यूएसए सबस्टेशन संरचना सप्लाय करणार आहे. गेल्या आठवड्यात, कंपनीने सांगितले होते की त्यांना भारत,

मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि यूएसमध्ये ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन (T&D) प्रोजेक्ट्ससाठी 1000 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. यामध्ये भारतातील पॉवर ग्रीडमधून 765 केव्ही ट्रान्समिशन लाइन आणि 785 केव्ही जीआयएस सबस्टेशन,

यूएईमधील 132 केव्ही ट्रान्समिशन लाइन, ऑस्ट्रेलिया आणि यूएसएमध्ये टॉवर्सचा पुरवठा, यूएसएमध्ये हार्डवेअर आणि पोलचा पुरवठा यांचा समावेश आहे. नवीन ऑर्डरसह, कंपनीच्या ऑर्डरचे प्रमाण या वर्षी आतापर्यंत 7500 कोटी ओलांडले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 70 टक्क्यांनी जास्त आहे असे केईसी इंटरनॅशनलचे एमडी आणि सीईओ विमल केजरीवाल यांनी सांगितले.

कंपनीचा कंसोलिडेटेड नेट प्रॉफिट 110.3 टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत 151.75 कोटी झाला, जो आर्थिक वर्ष 2023 चौथ्या तिमाहीत 72.17 कोटी होता. कंपनीची नेट सेल्स 6164.83 कोटी आहे, जी वार्षिक 11.6 टक्क्यांनी वाढली आहे.

KEC इंटरनॅशनल ही इंफ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कंस्ट्रक्शन (EPC) मधील ग्लोबल प्लेएर आहे. कंपनी पावर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन, रेल्वे, सिव्हिल इंजिनिअरिंग, शहरी इंफ्रास्ट्रक्चर, सौर ऊर्जा, ऑईल अँड गॅस पाइपलाइन आणि केबल्ससह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com