New Rule 1 September 2024: गुगल, आधार कार्ड आणि मेसेजिंग-कॉलिंगच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम मोबाईल युजरवर होणार आहे. जे नियम बदलले जात आहेत त्यात गुगल प्ले स्टोअर पॉलिसी, NPCI, UIDAI आणि TRAIच्या नियमांचा समावेश आहे.
ट्रायने फेक कॉल्स आणि मेसेज बंद करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना 30 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच आधार अपडेटबाबत एक मोठी बातमी आहे. याशिवाय गुगल आपल्या प्लॅटफॉर्मवरून काही ॲप्स काढून टाकत आहे. जर तुम्ही UPIचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे.
Googleचे नवीन Play Store धोरण 1 सप्टेंबर 2024 पासून लागू केले जात आहे. गुगलचे म्हणणे आहे की, 1 सप्टेंबरपासून Google अशा हजारो ॲप्स आपल्या Play Store वरून काढून टाकणार आहे, जे Google Play Store वर कमी दर्जाचे ॲप्स आहेत.
गुगल क्वालिटी कंट्रोलने फ्रॉड ॲप्स काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा परिणाम जगभरातील अँड्रॉइड स्मार्टफोन युजरवर होऊ शकतो. आपल्या यूजर्सची सुरक्षा आणि गोपनीयता लक्षात घेऊन असा निर्णय घेण्यात आल्याचे गुगलचे म्हणणे आहे.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षे जुने असेल, तर तुम्ही 14 सप्टेंबरपूर्वी ते मोफत अपडेट करू शकता.
माय आधार पोर्टलद्वारे मोफत आधार कार्ड अपडेट केले जाईल. तुम्ही आधार केंद्राला भेट देऊन आधार अपडेट केल्यास, तुम्हाला सेवा शुल्क म्हणून 50 रुपये द्यावे लागतील.
सर्व प्रथम तुम्हाला UIDAI myaadhaar.uidai.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
यानंतर, तुम्हाला वरच्या बाजूला अपडेट आधारचा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला टॅप करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी आधार क्रमांक आणि OTP टाकून पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करून पडताळणी करावी लागेल.
ओळखपत्राचे स्कॅन आणि पत्त्याचा पुरावा ड्रॉप डाउन मेनूमध्ये अपलोड करावा लागेल.
यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्ही आधार अपडेटची स्थिती तपासू शकाल.
ट्रायने 1 सप्टेंबरपासून फेक कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अंतर्गत Airtel, Vodafone-Idea, Jio आणि BSNL सारख्या दूरसंचार कंपन्यांना नोंदणी नसलेले मेसेज आणि कॉल्स ओळखून ब्लॉक करावे लागतील. त्यासाठी 30 सप्टेंबर 2024 ही मुदत देण्यात आली आहे. काही मोबाइल वापरकर्त्यांना 1 सप्टेंबरपासून बँकिंग कॉल, संदेश आणि OTP प्राप्त होण्यास विलंब होऊ शकतो.
जर तुम्ही ऑनलाइन बँकिंग किंवा ओटीपी आधारित पेमेंट किंवा डिलिव्हरी करत असाल तर ओटीपी मिळण्यास विलंब होऊ शकतो, अशा स्थितीत तुम्हाला ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग यासारख्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात.
NPCI च्या नवीन नियमांनुसार, आता RuPay क्रेडिट कार्ड आणि UPI व्यवहार शुल्क तुमच्या RuPay रिवॉर्ड पॉइंट्समधून कापले जाणार नाहीत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याप्रकरणी सर्व बँकांना कळवले आहे. NPCI चा हा नवीन नियम 1 सप्टेंबर 2024 पासून देशभरात लागू होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.