करदेयता प्रमाणपत्र

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये भारतातून परदेशात जाण्याची योजना आखणाऱ्यांसाठी केलेल्या नव्या करतरतुदीनुसार, कर भरण्यास जबाबदार किंवा करथकबाकी असलेली व्यक्ती कर भरल्याशिवाय देश सोडू शकणार नाही.
करदेयता प्रमाणपत्र
करदेयता प्रमाणपत्र sakal
Updated on

करकायदा

डॉ. दिलीप सातभाई , चार्टर्ड अकाउंटंट- सीए

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये भारतातून परदेशात जाण्याची योजना आखणाऱ्यांसाठी केलेल्या नव्या करतरतुदीनुसार, कर भरण्यास जबाबदार किंवा करथकबाकी असलेली व्यक्ती कर भरल्याशिवाय देश सोडू शकणार नाही. भारतात राहणाऱ्या व्यक्तींनी देश सोडण्यापूर्वी सर्व थकीत कर भरणे आणि टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच करदेयता नसल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, असे अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थात, परदेशात जाणाऱ्या सर्वच निवासी नागरिकांना हे कर भरल्याचे वा थकीत बाकी नसल्याचे प्रमाणपत्र प्राप्तिकर विभागाकडून घेण्याची आवश्यकता नाही, तर केवळ ज्या व्यक्ती पूर्वघोषित विशिष्ट निकषांची पूर्तता करतील, त्यांनाच असे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात आर्थिक अनियमिततांमध्ये सहभाग असलेल्या किंवा मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी असणाऱ्यांना हे प्रमाणपत्र घेणे आता बंधनकारक आहे. काळा पैसा कायदा, २०१५ अंतर्गत हे अनिवार्य करण्यात आले आहे. ही नवी तरतूद एक ऑक्टोबर २०२४ पासून अंमलात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.