Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे चांदीचे नाणे अर्थ मंत्रालयाने केले जारी; कसे आणि कुठे खरेदी करायचे?

Ram Mandir Silver Souvenir coins: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाविकांसाठी रामलल्ला यांचे विशेष चांदीचे नाणे जारी केले आहे. याशिवाय त्यांनी बुद्ध आणि एक शिंग असलेला गेंडा यांच्यावर असलेली आणखी दोन नाणीही जारी केली.
Nirmala Sitharaman releases souvenir coins on Ram Janmabhoomi Temple, Ayodhya and Ram Lalla
Nirmala Sitharaman releases souvenir coins on Ram Janmabhoomi Temple, Ayodhya and Ram LallaSakal
Updated on

Ram Mandir Silver Souvenir coins: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाविकांसाठी रामलल्ला यांचे विशेष चांदीचे नाणे जारी केले आहे. याशिवाय त्यांनी बुद्ध आणि एक शिंग असलेला गेंडा यांच्यावर असलेली आणखी दोन नाणीही जारी केली. (Nirmala Sitharaman releases souvenir coins on Ram Janmabhoomi Temple, Ayodhya and Ram Lalla)

ज्यांना अयोध्येला पोहोचून रामलल्लाचे दर्शन घेता येत नाही, ते घरी बसून ऑनलाइन राम मंदिराचा प्रसाद मागवत आहेत. आता लोक रामलल्ला आणि राम मंदिरावर बनवलेली चांदीची नाणीही खरेदी करू शकणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 15 फेब्रुवारी रोजी 3 नाणी जारी केली. यामध्ये 1 नाणे रामलल्ला आणि रामजन्मभूमी मंदिर अयोध्या यावर आधारित आहे. सरकारच्या अधिकृत साइटवरूनही ही नाणी खरेदी करता येतील.

Nirmala Sitharaman releases souvenir coins on Ram Janmabhoomi Temple, Ayodhya and Ram Lalla
Sovereign Gold Bond: स्वस्त सोने खरेदी करण्याचा आज शेवटचा दिवस; किती आहे किंमत?

हे चांदीचे नाणे 50 ग्रॅम वजनाचे असून 999 शुद्ध चांदीपासून बनवले आहे. या नाण्याच्या एका बाजूला अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिराचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला रामलल्ला मंदिराच्या गर्भगृहात बसल्याचे चित्र आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केलेली रामलल्लाची मूर्ती ही म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे.

Ram Mandir Silver Souvenir coins
Ram Mandir Silver Souvenir coinsSakal

राम मंदिराचे नाणे कुठे खरेदी कराल?

भगवान रामलल्ला आणि अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या संदर्भात जारी केलेले हे नाणे 50 ग्रॅम वजनाचे असून ते शुद्ध चांदीचे आहे. त्याची किंमत 5 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. हे नाणे खरेदी करून तुमच्या घरातील मंदिरात ठेवता येऊ शकते.

Nirmala Sitharaman releases souvenir coins on Ram Janmabhoomi Temple, Ayodhya and Ram Lalla
Ullu Digital IPO: उल्लू डिजिटल सर्वात मोठा IPO आणणार; 'इतके' कोटी उभारण्याचा प्लॅन

याशिवाय हे नाणे तुमच्या जवळच्या व्यक्तींना भेटवस्तू देण्यासाठी देखील एक चांगला पर्याय असू शकतो. हे नाणे खरेदी करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiagovtmint.in/souvenir-coins वर जावे लागेल. या साइटवर नमूद केलेली प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही रामलल्ला आणि राम मंदिराचे चांदीचे नाणे खरेदी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.