Nirmala Sitharaman : आता केंद्रीय अर्थसंकल्पाचे वेध....सीतारामन यांची राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी लवकरच चर्चा
GST : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन डिसेंबरमध्ये राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करणार आहेत. जीएसटी परिषदेच्या बैठकीत आरोग्य आणि विमा योजनांवरील जीएसटी कर कमी करण्यावर निर्णय होऊ शकतो.
नवी दिल्ली : पुढील वर्षीच्या सुरुवातीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन डिसेंबर महिन्यात राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांकडून मंगळवारी सांगण्यात आले.