10% GST On Diesel Cars: कंपन्यांचे शेअर्स घसरताच नितीन गडकरींचा यू-टर्न! म्हणाले...

10% GST On Diesel Cars: नितीन गडकरी म्हणाले होते की डिझेल वाहनांवर अतिरिक्त 10 टक्के जीएसटी लावला पाहिजे.
10% GST On Diesel Cars
10% GST On Diesel CarsSakal
Updated on

10% GST On Diesel Cars: डिझेल वाहनांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याच्या मागणीवर रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी 'X'वर केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, सध्या अतिरिक्त जीएसटी लागू करण्याची कोणतीही योजना नाही. सध्या असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.

यापूर्वी, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या 63 व्या परिषदेत नितीन गडकरी म्हणाले होते की, डिझेल वाहनांवर अतिरिक्त 10 टक्के जीएसटी लावला पाहिजे.

ते अर्थ मंत्रालयाकडे याची मागणी करणार आहेत आणि त्यांनी यासंबंधीचा मसुदा तयार केला आहे. गडकरींच्या या वक्तव्यानंतर औद्योगिक आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्ममध्ये मोठी घसरण झाली.

10% GST On Diesel Cars
Gautam Adani: गौतम अदानींना वाचवण्यासाठी सेबीने लपवली माहिती, सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत केला आरोप

डिझेल वाहनांवरील अतिरिक्त जीएसटीवरील त्यांच्या विधानावर, गडकरींनी 'X' वर पोस्ट केले की, "डिझेल वाहनांच्या विक्रीवर 10% अतिरिक्त जीएसटी लावण्याच्या मीडिया रिपोर्ट्सवर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.

असा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नसल्याचे स्पष्ट करणे गरजेचे आहे. 2070 पर्यंत कार्बन निव्वळ शून्य गाठण्यासाठी आणि डिझेलसारख्या हानिकारक इंधनामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच ऑटोमोबाईल विक्रीत वेगाने वाढ करण्याच्या आमच्या योजनेनुसार स्वच्छ आणि पर्यायी इंधनांचा वापर करणे महत्त्वाचे आहे.

ही इंधने स्वस्त, स्वदेशी आणि प्रदूषणमुक्त असावीत. सध्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी आकारला जातो.

10% GST On Diesel Cars
Nitin Gadkari: डिझेल कार घेणे होणार महाग, 10 टक्के जीएसटी लावण्याचा नितीन गडकरींचा प्रस्ताव

ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण

नितीन गडकरींच्या या विधानानंतर वाहन कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अशोक लेलँड, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये 4.5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

या कंपन्या डिझेल वाहनांचे उत्पादन करतात. मात्र, निफ्टी ऑटो सेक्टरल इंडेक्सही 2.5 टक्क्यांनी घसरला. निर्देशांकात समाविष्ट असलेल्या 15 पैकी 14 शेअर्समध्ये विक्री दिसून आली. अशोक लेलँडमध्ये सर्वात मोठी घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.