Bill Gates Meets PM Modi: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, त्याआधी ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीत गेले आणि तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बिल गेट्स हे इनोव्हेशन फॉर पब्लिक गुड या विषयावर विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी आले होते. संबोधनात बिल गेट्स यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक हितासाठी करण्यास प्रोत्साहित केले.
पीएम मोदी बिल गेट्स यांच्या भेटीसाठी खूप उत्सुक दिसत होते. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बिल गेट्सचे कौतुक केले आणि लिहिले की आमची भेट खूप छान होती. गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या भेटीव्यतिरिक्त बिल गेट्स यांनी देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली. भेटीदरम्यान दोघांनी एकमेकांना एक पुस्तक भेट दिले.
बिल गेट्स म्हणाले,"कोणताही देश भारतापेक्षा सरकारी लाभ घेण्यास आणि ते कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास सक्षम नाही," पीएम मोदींसोबतचे त्यांचे फोटो शेअर करताना बिल गेट्स यांनी लिहिले, त्यांना भेटणे नेहमीच प्रेरणादायी असते. आणि चर्चा करण्यासाठी खूप काही होते. आम्ही सार्वजनिक हितासाठी AI बद्दल बोललो. (No country to able to take govt benefits to citizens than india says bill gates)
भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत बिल गेट्स म्हणाले की, या देशात एआयचे बरेच काम केले जात आहे. तुमच्याकडे आयआयटी ग्रुप्स आहेत ज्यात अत्याधुनिक सुविधा आहेत. आणि जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स गरीब लोकांच्या आरोग्यासाठी आणि शेतीसाठी मदत करेल, तेव्हा आमचे फाउंडेशन त्यांना मदत करण्यास मागेपुढे पाहणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.