RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes: 2000 रुपयांच्या नोटा बंद केल्याबद्दल आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, आरबीआयचा 2000 रुपयांच्या नोटा आणण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. 2000 रुपयांच्या नोटा जमा केल्या जातील.
सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी बँकांना पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की नोटाबंदीनंतर नोटांची भरपाई करण्यासाठी 2000 रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या.
आरबीआय गव्हर्नर यांची पहिली प्रतिक्रिया:
मुंबईत RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याबाबत सांगितले की, चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून लोक सहज नोट बदलू शकतात. 4 महिने ही बाब गांभीर्याने घेण्याची वेळ आहे. नोटा बदलून घेण्यासाठी भरपूर वेळ आहे.
आरबीआय गव्हर्नर म्हणाले की भारताची चलन व्यवस्थापन प्रणाली अतिशय मजबूत आहे. 500 रुपयांच्या आणखी नोटा चलनात आणण्याचा निर्णय जनतेच्या मागणीवर अवलंबून असेल.
शक्तीकांता दास म्हणाले की, 2000 ची नोट आणण्यामागे अनेक कारणे होती आणि धोरणांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले. लोकांनी जुन्या नोटा बदलण्यावरील बंदी गांभीर्याने घेतली तर चांगले होईल.
मात्र, बँकांना नोटा बदलण्याचा डाटा तयार करून 2000 च्या नोटांचा तपशील बँकेत ठेवावा लागेल. 2000 च्या नोटा बदलण्याची सुविधा सामान्य असेल.
2000 च्या नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आला असून बँकांमध्ये पूर्ण तयारी करण्यात आली आहे. लोकांनी बँकेत येण्याची घाई करू नये आणि बाजारात इतर नोटांचा तुटवडा नाही.
2000 च्या नोटांवरील निर्णय क्लीन नोट धोरणाचा भाग:
RBI गव्हर्नर म्हणाले की चलनातून 2000 च्या नोटा काढून घेणे क्लीन नोट धोरणाचा भाग आहे. नोटा बदलण्यासाठी खूप वेळ आहे, त्यामुळे लोकांनी नोटा बदलताना कोणत्याही प्रकारची घाई करू नये.
आरबीआय ज्या काही अडचणी येतील ते ऐकून घेईल आणि जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात घेईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.