Noel Tata: टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा भारताचे नागरिक नाहीत; कोणत्या देशाचे आहेत नागरिक?

Noel Tata Citizenship: रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोएल टाटा रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. बोर्डाने एकमताने नोएल यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतला.
Noel Tata Citizenship
Noel Tata CitizenshipSakal
Updated on

Noel Tata Citizenship: रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोएल टाटा रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. बोर्डाने एकमताने नोएल यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतला. नोएल आता टाटा समूहाच्या सेवाभावी संस्थांचे नेतृत्व करणार आहेत.

टाटा ट्रस्टच्या स्थापनेत रतन टाटा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 66 टक्के हिस्सा आहे. टाटा समूह केवळ टाटा ट्रस्टद्वारे चालवला जातो.

नोएल टाटा आणि रतन टाटा हे दोघेही दिवंगत नवल टाटांचे पुत्र आहेत. रतन टाटा हे नवल टाटा यांची पहिली पत्नी सुनी कमिसरिएट यांचे पुत्र होते. तर नोएल टाटा हे त्यांची दुसरी पत्नी सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत. नोएल टाटा यांच्याकडे आयरिश नागरिकत्व आहे.

नोएल यांनी टाटा समूहाची रिटेल शाखा ट्रेंटचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी टाटा इंटरनॅशनल आणि टाटाच्या इतर उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टाटा इंटरनॅशनलमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी यूकेमधील नेस्ले येथे काम केले. संपूर्ण भारतात 700हून अधिक आऊटलेट्स असलेल्या ट्रेंटचे एका दुकानातून साखळीत रूपांतर करण्याचे श्रेय नोएल यांना जाते.

नोएल यांचा जन्म 1957 मध्ये मुंबईत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. यानंतर ते ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथल्या ससेक्स युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदवी घेतली.

Noel Tata Citizenship
Hyundai Motor IPO: देशातील सर्वात मोठा IPO उघडला; शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग, गुंतवणूक करावी का?

नोएल टाटा यांचे लग्न शापूरजी पालोनजी ग्रुपचे दिवंगत चेअरमन पालोनजी मिस्त्री यांची मुलगी अलु मिस्त्री यांच्याशी झाले आहे. शापूरजी पालोनजी हे टाटा समूहातील महत्त्वाचे भागधारक होते. रिपोर्ट्सनुसार, 2011 मध्ये नोएल टाटा यांचे मेहुणे सायरस मिस्त्री यांना रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले होते.

2016 मध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. यानंतर रतन टाटा यांनी फेब्रुवारी 2017 पर्यंत चार महिने तात्पुरती ही भूमिका पुन्हा बजावली. त्यानंतर नटराजन चंद्रशेखरन यांना टाटा समूहाचे अध्यक्ष करण्यात आले. सध्या तरी ते ही जबाबदारी सांभाळत आहेत.

Noel Tata Citizenship
Timberland: ईशा अंबानींची मोठी डील; टिंबरलँडचे भारतात पुनरागमन, कोणत्या प्लॅटफॉर्मवर खरेदी करता येणार?

नोएल आणि अलु यांना तीन मुले आहेत, त्यांची नावे लेह, माया आणि नेव्हिल आहेत. अलु मिस्त्रीसोबतच्या लग्नामुळे टाटा समूहातील त्यांचे संबंध दृढ झाले. रतन टाटा यांचा धाकटा भाऊ जिमीही याच कुटुंबात आहे.

जिमी टाटा यांनीही लग्न केलेले नाही आणि ते एकटे राहतात. पण रतन टाटा यांच्याप्रमाणेच जिमी टाटा यांचे टाटा सन्स आणि टाटा कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत. याशिवाय जिमी सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.