Nokia India: नोकिया इंडियाचे प्रमुख बदलले अन् आता 10,000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात! काय आहे कारण?

Nokia India Head: नोकियाने अलीकडेच आपल्या कामात सुधारणा करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी काही बदल केले आहेत. या बदलांचा एक भाग म्हणून, कंपनीने तरुण छाब्रा यांची भारताचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
nokia appoints new india head company to cut over 10000 jobs
nokia appoints new india head company to cut over 10000 jobsSakal
Updated on

Nokia India Head: नोकियाने अलीकडेच आपल्या कामात सुधारणा करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी काही बदल केले आहेत. या बदलांचा एक भाग म्हणून, कंपनीने तरुण छाब्रा यांची भारताचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

तरुण यापूर्वी नोकियामध्ये मोबाइल नेटवर्क विभागाचे प्रमुख होते. ते संजय मलिक यांची जागा घेतील. संजय मलिक यांनी जवळपास आठ वर्षे भारतात नोकियाचे काम पाहिले आहे.

संजय मलिक यांचे काम 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. नोकिया इंडियामध्ये तरुण छाब्रा एप्रिल 2024 पासून कंपनीचे भारतातील प्रमुख म्हणून काम करण्यास सुरुवात करतील. असे वृत्त मनीकंट्रोलने दिले आहे.

nokia appoints new india head company to cut over 10000 jobs
Indian Hotels: संख्या विक्रमी वेगाने वाढली पण रूम्स भरणार कधी? भारतीय हॉटेल उद्योगापुढे मोठा प्रश्न

नोकियाच्या ताज्या रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या ब्रँडला जगात एक नवीन ओळख देण्यासाठी हजारो लोकांना नोकरीतून काढून टाकू शकते. कंपनी आपला खर्च कमी करण्यासाठी 2024 मध्ये जागतिक स्तरावर सुमारे 11,000 ते 14,000 कर्मचारी काढून टाकू शकते.

कंपनीचे म्हणणे आहे की, ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी कंपनीत हे बदल केले जात आहेत. परंतु, या बदलांमुळे ग्राहक सेवा, विक्री आणि मार्केटींग यांसारख्या विभागातही काही लोकांना कामावरून कमी केले जात आहे.

nokia appoints new india head company to cut over 10000 jobs
India Thali Prices: सर्वसामान्यांना मोठा झटका; जेवणाची थाळी झाली महाग, काय आहे कारण?

नोकियाने गेल्या वर्षी भारतात मोठे 5G नेटवर्कचा विस्तार करुन चांगला नफा कमावला असला तरी, कंपनीला काही समस्यांचाही सामना करावा लागला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2023 मध्ये नोकियाची भारतातील कमाई 33% कमी झाली.

ऑक्टोबरमध्ये कंपनीने जगभरातील बदलांची घोषणा केली होती, त्यानंतर भारतातही बदल सुरू झाले. हे बदल डिसेंबर अखेरपर्यंत सुरु राहतील. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या सोडण्यास सांगण्यात आले आहे. कंपनी सोडताना अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.