NPS Rule: पेन्शन नियमांमध्ये बदल होण्याचे संकेत, NPS मधून काढता येणार पूर्ण रक्कम?

NPS Rule: नॅशनल पेन्शन स्कीमच्या नियमांमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Signs of change in pension rules you will be able to withdraw the entire amount from NPS in installments
Signs of change in pension rules you will be able to withdraw the entire amount from NPS in installmentsSakal
Updated on

NPS Rule: नॅशनल पेन्शन स्कीमच्या (NPS) नियमांमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सिस्टिमॅटिक विथड्रॉल फॅसिलिटी (SLW) द्वारे NPS खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा 60 टक्क्यांवरून 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार सुरु आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर (PFRDA) चे अध्यक्ष डॉ. दीपक मोहंती यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या NPS शिबिरात याचे संकेत दिले आहेत.

PFRDA ने अलीकडे NPS सदस्यांसाठी पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत निवृत्तीनंतर सदस्य किंवा वयाच्या 60 व्या वर्षी प्राप्त झालेल्या मॅच्युरिटी रकमेच्या 60 टक्के रक्कम मासिक/त्रैमासिक/अर्धवार्षिक किंवा वार्षिक आधारावर काढू शकतात.

Signs of change in pension rules you will be able to withdraw the entire amount from NPS in installments
CWC 2023: क्रिकेटमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक करुन देशाला किती फायदा होतो?

ही सुविधा सेवानिवृत्तीच्या तारखेपासून ते वयाच्या 75व्या वर्षापर्यंत उपलब्ध आहे. यापूर्वी हा निधी वार्षिक आधारावर किंवा एकरकमी काढण्याची परवानगी होती. SLW सुविधेतील NPS सदस्यांना 75 वर्षे वयापर्यंत वार्षिकी/पेन्शन योजनेचे संपूर्ण पैसे NPS खात्यात ठेवू शकतात आणि नियमित अंतराने काढू शकतात.

PFRDA च्या नवीन प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास सदस्यांना SLW मधून 100 टक्के रक्कम काढण्याची परवानगी दिली जाईल. पेन्शन नियामकांचे म्हणणे आहे की यामुळे पैसे दीर्घकाळ एनपीएस फंडात राहतील आणि सदस्यांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळत राहील.

Signs of change in pension rules you will be able to withdraw the entire amount from NPS in installments
InterGlobe Aviation: इंटरग्लोब एव्हिएशनला 1,666 कोटींची कर नोटीस; काय आहे प्रकरण?

एनपीएस सदस्यांना SLW सुविधा सुरू करण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडद्वारे विनंती करावी लागेल. ग्राहकांना या सुविधेची सुरुवात आणि समाप्ती तारीख नमूद करावी लागेल. त्यांना कोणत्या अंतराने किती रक्कम हवी आहे हे देखील सांगावे लागेल. प्रत्येक पेमेंटनंतर उर्वरित रक्कम NPS मध्ये गुंतवली जाईल. या उर्वरित रकमेवर परतावा मिळत राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()