NPS Vatsalya Scheme: एनपीएस वात्सल्य : भावी पिढ्यांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक
युवा वर्गाला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सक्षम करणारी ही योजना आहे. तिच्या माध्यमातून पालक तसेच मुलांचे पालकत्व घेतलेल्या सर्वांनाच मुलांच्या लहान वयाच्या टप्प्यापासूनच गुंतवणूक करण्याला प्रोत्साहन मिळेल.
NPS Vatsalya scheme better investment plan for next generationsakal
एनपीएस वात्सल्य ही योजना म्हणजे, आपल्या मुलांच्या संरक्षित भविष्यासाठी पालकांना सक्षम करणारे एक नावीन्यपूर्ण आर्थिक साधन आहे. या योजनेमुळे शिस्तबद्ध बचतीची सवय लागेल. दीर्घकालीन उपयुक्त ठरणारी संपत्तीनिर्मितीची ही संधीच असणार आहे.