NPS Vatsalya Scheme :आली मोदी सरकारची मोठी स्कीम! पालकांसह करा मुलांच्याही भविष्याची तरतूद! कसा करायचा NPSचा अर्ज?

All About NPS Vatsalya Scheme : पालकांची निवृत्ती अन् मुलांचे भविष्य दोन्हीची काळजी मिटवणारी लाभदायी योजना, जाणून घ्या NPS बद्दल सर्वकाही
NPS Vatsalya Scheme
NPS Vatsalya Schemeesakal
Updated on

How To Apply NPS Vatsalya Scheme :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ च्या बजेटमधून NPS वात्सल्य ही एक नवी योजना जाहीर केली होती. पालक आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी ही योजना महत्त्वाची असणार आहे. ही योजना आज सुरू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात NPS वात्सल्य योजनेचा शुभारंभ करणार आहेत.  

NPS वात्सल्यचे सदस्यत्व घेण्यासाठी अर्थमंत्री एक पोर्टल सुरू करतील. यावेळी, त्या योजनेशी संबंधित एक माहितीपत्रकही जारी करतील, ज्यामध्ये NPS वात्सल्यबद्दल संपूर्ण तपशील दिलेला असेल.  (NPS Vatsalya Scheme)

NPS Vatsalya Scheme
NPS Retirement Plan : चाळीशी गाठली तरीही रिटायरमेंटचा प्लॅन तयार नाही? काळजी करू नका, अशी मिळवा महिन्याला 50 हजार रुपयांची पेन्शन

NPS योजना काय आहे?

आता या नव्या NPS वात्सल्य योजनेच्या माध्यमातून पालक फक्त स्वतःच्या भविष्याची नाही तर आपल्या मुलांच्या भविष्याची देखील तरतूद करू शकणार आहे. एखाद्या अल्पवयीन मुलाचे किंवा मुलीचे आईवडील किंवा पालक त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करू शकणार आहेत. यासाठी आई वडील आपल्या मुलांच्या नावे खाते उघडून त्यात नियमितपणे पैशांची गुंतवणूक करू शकतात. (NPS Vatsalya Scheme) 

NPS Vatsalya Scheme
हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जाहीर

इतक्या कमी रूपयात करता येईल गुंतवणूक

NPS-वात्सल्य योजनेअंतर्गत, पालक किंवा पालक मुलाच्या नावावर किमान १००० रूपयांचे चे खाते उघडू शकतील. त्यानंतर, १८ वर्षे वयापर्यंत, पालक किंवा पालकांना दरवर्षी मुलाच्या NPS-वात्सल्य खात्यात किमान १००० रुपये जमा करावे लागतील.

SBI पेन्शन फंड प्लॅटफॉर्मनुसार, या खात्यात जास्तीत जास्त रक्कम जमा करण्याची मर्यादा नाही. पाल्य १८ वर्षांचे झाल्यावर NPS ‘वात्सल्य’ सुद्धा नॉन- NPS योजनेत रूपांतरित केले जाऊ शकते.

NPS Vatsalya Scheme
Investment Planning : फक्त 5000 रुपयांची गुंतवणूक करा अन् बना कोट्यधीश; जाणून घ्या, कसं?

मॅक्स लाइफ पेन्शन फंड मॅनेजमेंटचे सीईओ रणवीर सिंग धारिवाल काय म्हणाले NPS बद्दल

NPS वात्सल्य योजना अल्पवयीन मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत पालक मुलांसाठी गुंतवणूक करतात.  मूल १८ वर्षांचे झाल्यावर ही योजना नियमित राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) रूपांतरित होते.

पालक त्यांच्या अल्पवयीन मुलासाठी एनपीएस खाते उघडून मुलांच्या लहानपणापासूनच जबाबदार पालक असल्याचा पाया घालतात. मुलांना या योजनेची माहिती देऊन ते तारुण्यात बचतीच्या सवयी सुरळीतपणे चालू ठेवण्यास मदत करतात,असेही ते म्हणाले.

NPS Vatsalya Scheme
NPS Rules Change: वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय पेन्शन योजनेत होणार बदल; काय आहे मोदी सरकारचा नवा प्लॅन?

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

भारतीय नागरिक, NRI आणि OCI सह सर्व पालक आणि पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी NPS वात्सल्य खाते उघडण्यास पात्र आहेत.

NPS Vatsalya Scheme
NPS Vatsalya Scheme: पालकही करु शकणार मुलांच्या निवृत्ती वेतनाचं नियोजन; मोदी सरकारची एनपीएस-वात्सल्य योजना समजून घ्या सोप्या भाषेत

कसा करावा अर्ज 

  • सर्वप्रथम, तुम्हाला नॅशनल पेन्शन सिस्टमच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल https://www.npscra.nsdl.co.in/

  • आता मुख्य पेजवर तुम्हाला नोंदणी नावाचा टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक करा, आधार कार्डसह नोंदणी करा

  • इथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक एंटर करा आणि त्यावर ओटीपी पाठवला जाईल.

  • आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर तिथे टाका त्यावर आलेला OTP टाका आणि Verify बटणावर क्लिक करा

  • तुमच्या आधारशी संबंधित काही माहिती आधीच भरली जाईल. तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता इत्यादी काही तपशील भरावे लागतील.

  • तुमच्या स्वाक्षरीची स्कॅन केलेली फोटो प्रत अपलोड करा.

  • त्यानंतर तुम्ही पेमेंट कोणत्या पर्यायाने करणार आहात ते सिलेक्ट करा

  • यानंतर तुमचे NPS खाते उघडले जाईल. तुम्हाला तुमचा खाते क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()