NSDL FPI Investments : परकी गुंतवणूकदारांची खरेदी, १.७४ लाख कोटींची भर; एनएसडीएलच्या आकडेवारीवरून स्पष्ट

तेजीचा परिणाम : डिसेंबर मध्यापर्यंत१.७४ लाख कोटींची भर
nsdl fpi investments share market debt fund hybrid fund it and bank stock investment
nsdl fpi investments share market debt fund hybrid fund it and bank stock investmentsakal
Updated on

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातील तेजीमुळे परकी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) खरेदीवर भर दिला असून, डिसेंबरच्या मध्यापर्यंत त्यांनी सर्वाधिक गुंतवणूक केली असल्याचे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या (एनएसडीएल) आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

डिसेंबरच्या मध्यापर्यंत परकी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 42 हजार 733 कोटी रुपयांची शेअर खरेदी केली आहे, तर चालू आर्थिक वर्षात 15 डिसेंबरअखेरपर्यंत परकी गुंतवणूकदारांनी केलेली एकूण गुंतवणूक 1.74 लाख कोटी रुपये आहे.

आर्थिक वर्ष 2021 नंतरची ही सर्वाधिक आवक आहे. आर्थिक वर्ष 2022 आणि 2023 मध्ये ‘एफपीआय’नी भारतीय शेअरची विक्री केली होती. ‘एफपीआय’नी डिसेंबर महिन्यात १५ तारखेपर्यंत शेअरसह डेट फंड, हायब्रिड फंड आदी पर्यायांमध्ये केलेली एकूण गुंतवणूक ५१ हजार ७८७ कोटी रुपयांची आहे.

सर्वाधिक खरेदी आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअरची करण्यात आली आहे, असेही ‘एनएसडीएल’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. हा कल यापुढेही कायम राहिल्यास ऑगस्ट 2022 नंतरची सर्वोच्च पातळी गाठली जाईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्यांत विक्री केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये परकी गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार बनले होते.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात करण्याचे सूतोवाच केल्याने अमेरिकी रोख्यांचे उत्पन्न कमी झाले आहे, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने भारताचा विकासदराचा अंदाज वाढवला आहे.

त्याचबरोबर अनेक जागतिक पतमानांकन संस्थांनीदेखील भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरात सुधारणा केली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यातील निवडणूक निकालांनी 2024 मध्ये स्थिर सरकार मिळण्याचा आणि धोरण सातत्य राहण्याचा विश्‍वास निर्माण केला आहे.

अशा विविध कारणांमुळे परकी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला असून, खरेदीला चालना मिळाली आहे, असे विश्लेषकांनी सांगितले. डिसेंबरच्या मध्यापर्यंत ‘निफ्टी’ आणि ‘सेन्सेक्स’ प्रत्येकी 6.6 टक्क्यांनी वाढले असून, जुलै 2022 नंतरची ही सर्वोत्तम वाढ आहे. यामुळे देशांतर्गत शेअर बाजार पुढेही वाढण्याचा अंदाज आहे, असे ‘प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज’चे अविनाश गोरक्षकर यांनी सांगितले.

गुंतवणूक वाढण्याची कारणे...

  • अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्याजदर कमी करण्याचे सूतोवाच

  • अमेरिकी रोख्यांच्या उत्पन्नात झालेली घसरण

  • भारताच्या विकासदराच्या अंदाजात विविध संस्थांनी केलेली वाढ

  • भारतीय शेअर बाजारात तेजी

  • राहण्याचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.