Demat Account India : ट्रेडिंगकडे वाढतोय नागरिकांचा कल, देशातील डी-मॅट खात्यांची संख्या प्रथमच १३ कोटींवर

Trading Account : एकट्या सप्टेंबर महिन्यात भारतात ३० लाखांहून अधिक नवी खाती तयार झाली आहेत.
Demat Account India
Demat Account IndiaeSakal
Updated on

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस देशातील डी-मॅट खात्यांची संख्या प्रथमच १३ कोटींवर गेली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात ३० लाख ६० हजार नवी डी-मॅट खाती उघडण्यात आली असून, एकूण खात्यांची संख्या १२ कोटी ९७ लाखांवर गेली आहेत. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत मासिक आधारावर सरासरी २१ लाख नवी खाती उघडली गेली आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.

डी-मॅट खात्यामुळे शेअर बाजार गुंतवणूक करणे अगदी सहज आणि कागदरहित झाली आहे. तसेच डी-मॅट खात्यांमुळे शेअर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जतन केले जातात.

Demat Account India
Power Bank Scam : 'हाय रिटर्न्स'चे आमिष दाखवून 150 कोटींची फसवणूक.. तुमच्याकडे तर नाहीत ना हे तीन अँड्रॉईड अ‍ॅप्स?

मोबाईल अ‍ॅपद्वारे आता ही सुविधा उपलब्ध आहे. अशी सेवा देणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये झेरोधा, ग्रो, एंजलवन, अपस्टॉक्स आदींचा समावेश आहे. सध्या या बाजारपेठेत‘ग्रो’ने १९.९ टक्के हिस्सा मिळवत पहिले स्थान मिळवले आहे. या कंपनीच्या डी-मॅट खातेधारकांची संख्या ६६ लाखांवर पोहोचली आहे.

त्यापाठोपाठ ‘झेरोधा’ने १९.४ टक्के बाजार हिस्सा मिळवला असून, त्यांच्याकडील डी-मॅट खातेधारकांची संख्या ६५ लाख आहे. ‘एंजलवन’कडे ४९ लाख, तर ‘अपस्टॉक्स’कडील खातेधारकांची संख्या २२ लाख आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

Demat Account India
Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

‘सीडीएसएल’कडे आठ कोटींहून अधिक खाती

देशातील‘सीडीएसएल’ आणि ‘एनएसडीएल’ या दोन डिपॉझिटरी संस्थाकडे मिळून सुमारे १२.९७ कोटी खाती असून, त्यात ‘सीडीएसएल’कडे आठ कोटींहून अधिक सक्रिय डी-मॅट खाती आहेत. खात्यांच्या संख्येच्या आधारावर ही देशातील सर्वांत मोठी डिपॉझिटरी असून, तिच्याकडे या बाजारपेठेतील ७४ टक्के हिस्सा आहे. ‘एनएसडीएल’कडे उर्वरित २६ टक्के हिस्सा असून, तिच्याकडे सुमारे पाच कोटी खाती आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.