टेक्नॉलॉजी क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या Nvidia कंपनीने Apple ला मागे टाकत जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे. Nvidia च्या जबरदस्त शेअरमूल्यवाढीमुळे शुक्रवारच्या व्यवहारांमध्ये तिच्या बाजारमूल्याने 3.53 ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला, तर Apple कंपनीचे बाजारमूल्य 3.52 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले होते. एआय चिप्सची वाढती मागणी आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील प्रचंड गुंतवणूक यामुळे Nvidia ने आपली प्रगती कायम ठेवली आहे.