Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेनिमित्त सराफ बाजाराला झळाळी

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून नागरिक सोन्या-चांदीची दागिने खरेदी करतात. गुंतवणूक म्हणूनही सोने-चांदी खरेदीला पसंती दिली जाते. अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याच्या भावात झालेली हलकी घट आणि मुहूर्तावर केली जाणारी खरेदी यामुळे शुक्रवारी (ता. १०) सराफ बाजाराला झळाळी आली.
Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024sakal
Updated on

पुणे : अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून नागरिक सोन्या-चांदीची दागिने खरेदी करतात. गुंतवणूक म्हणूनही सोने-चांदी खरेदीला पसंती दिली जाते. अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याच्या भावात झालेली हलकी घट आणि मुहूर्तावर केली जाणारी खरेदी यामुळे शुक्रवारी (ता. १०) सराफ बाजाराला झळाळी आली.

अनेकांनी मुहूर्त साधत आवडीच्या दागिन्यांची खरेदी केली. यामध्ये लग्नासाठी आवश्‍यक असलेल्या दागिन्यांची सर्वाधिक विक्री झाली. गंठण, मंगळसूत्र, मिनी गंठण, बांगड्या, पाटल्या आणि अंगठ्या यांचा त्यात समावेश होता. गेल्या काही दिवसांत सोन्याचे भाव कमी झाले. त्यामुळे यंदाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या बाजारपेठेत असलेली तेजी आणि येणारी लग्नसराईचा काळ यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या विक्रीमध्ये चांगली वाढ झाली.

एप्रिलमध्ये सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यात आता काहीशी घट झाली आहे. त्यामुळे ते पुन्हा वाढण्याआधी मी मुहूर्त साधत खरेदी केली. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सराफ व्यावसायिकांनी दिलेल्या ऑफरचा मला फायदा झाला. आम्ही मुलीच्या लग्नासाठी दागिन्यांची खरेदी केली.

- सुलभा पोकळे, ग्राहक

Akshaya Tritiya 2024
Gold Jewellery : एकवीस पानांचा हा साज आजही अस्सल कोल्हापुरी म्हणून ओळखला जातो..!

सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ होती. सोन्याच्या किमती वाढल्या असल्या, तरी ग्राहकांचा प्रतिसाद गुढीपाडव्याइतकाच भरघोस आहे. ग्राहक पूर्व मागणी नोंदवलेले दागिने घेण्यासाठीही येत आहेत. यंदाच्या विक्री उद्योगाच्या अपेक्षेनुसार असेल.

- डॉ. सौरभ गाडगीळ,

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.