OpenAI बोर्डमध्ये मायक्रोसॉफ्टची एन्ट्री, सॅम ऑल्टमन यांनी सीईओ म्हणून स्वीकारला पदभार

OpenAI New Board: कंपनीने सांगितले की सॅम ऑल्टमन OpenAI च्या CEO पदावर परतले आहेत.
OpenAI New Board
OpenAI New BoardSakal
Updated on

OpenAI New Board: आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी OpenAI ChatGPT चा पहिला वर्धापन दिन साजरा करत आहे. या प्रसंगी, कंपनीने सांगितले की सॅम ऑल्टमन OpenAI च्या CEO पदावर परतले आहेत. ऑल्टमन यांना काढून टाकल्यानंतर मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुरत्ती यांना अंतरिम सीईओ बनवण्यात आले होते.

याशिवाय OpenAI सह-संस्थापक ग्रेग ब्रॉकमन यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एवढेच नाही तर आता ओपनएआयमधील सर्वात मोठी गुंतवणूकदार असलेल्या मायक्रोसॉफ्टलाही कंपनीच्या नॉन प्रॉफिट बोर्डमध्ये नॉन-व्होटिंग ऑब्जर्वरचे पद दिले आहे.

याचा अर्थ Microsoft प्रतिनिधी OpenAI बोर्ड मीटिंगला उपस्थित राहू शकतात आणि गोपनीय माहिती मिळवू शकतात. परंतु त्याला संचालक निवडण्याचा किंवा त्यांच्या निवडणुकीसारख्या बाबतीत मतदान करण्याचा अधिकार नाही. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी ओपनएआयमध्ये प्रशासन बदलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. ओपनएआयमध्ये मायक्रोसॉफ्टचा 49% हिस्सा आहे.

OpenAI New Board
Narayana Murthy: 70 तासांच्या वक्तव्यानंतर आता नारायण मूर्ती म्हणाले, ''काहीही फुकट देऊ नये, मी पण....''

OpenAI च्या जुन्या बोर्डाने सॅम ऑल्टमन यांची कंपनीतून हकालपट्टी केली होती. यासोबतच ओपनएआयचे अध्यक्ष गर्ग ब्रॉकमन यांनाही बोर्डातून काढून टाकण्यात आले होते. मंडळातून काढून टाकल्यानंतर ब्रुकमन यांनीही अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर ओपनएआयच्या नवीन सीईओची घोषणा करण्यात आली, परंतु त्यानंतर सॅम ऑल्टमन कंपनीत परतले.

OpenAI New Board
Tata Technologies: टाटा टेक्नॉलॉजीची धमाकेदार लिस्टिंग; गुंतवणूकदारांना मिळाला 140 टक्के रिटर्न

ओपनएआयमधून काढून टाकल्यानंतर सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार होते. असेही जाहीर करण्यात आले. पण ओपनएआयच्या अनेक कर्मचाऱ्यांनी ऑल्टमननंतर कंपनी सोडण्याचा इशारा दिला. यानंतर, नवीन मंडळाची स्थापना करण्यात आली आणि सॅम ऑल्टमन यांना OpenAI चे CEO बनवण्यात आले. हे सर्व अवघ्या 5 दिवसांत घडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.