म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना घसरणीत संधी

शेअर बाजारात सातत्याने घसरण दिसून आली, की झालेला नफा काढून घेऊन म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक बंद करू का?
Mutual Fund
Mutual Fundsakal
Updated on

- डॉ. अशोक येवले, गुंतवणूक सल्लागार

शेअर बाजारात सातत्याने घसरण दिसून आली, की झालेला नफा काढून घेऊन म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक बंद करू का? पुन्हा जेव्हा बाजार आणखी खाली जाईल, तेव्हा परत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली, तर आणखी नफा होईल का? असे प्रश्‍न नवे गुंतवणूकदार सल्लागारांना विचारतात.

अनेक जण गुंतवणूक काढून घेतात. शेअर बाजारात घसरण होऊ लागली, की नवे म्युच्युअल फंड गुंतवणूकदार हमखास अशा चुका करतात आणि आपला दीर्घकालीन नफा गमावून बसतात. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी या आणि अशा काही चुका टाळणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही.

पडत्या बाजारात अधिक संधी

म्युच्युअल फंडांची रचना अशी असते, की ते पडत्या बाजारातसुद्धा फायदा देऊन जातात. कारण म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) गुंतवणूक केली जाते, तेव्हा त्या रकमेत त्या फंडाचे युनिट खरेदी केले जातात. शेअर बाजार घसरतात, तेव्हा त्या फंडाची ‘एनएव्ही’ कमी झालेली असते, त्यामुळे अधिक युनिट मिळतात आणि तुमच्याकडे असणाऱ्या युनिटची संख्या झपाट्याने वाढते.

बाजार स्थिर होऊन वरच्या दिशेने वाटचाल करू लागतो, तेव्हा या सर्व युनिटवर फायदा दिसायला लागतो, यालाच ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’ म्हटले जाते. त्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी शेअर बाजार घसरत असताना आपली गुंतवणूक काढण्याची चूक करू नये. त्यामुळे भविष्यात मिळणाऱ्या चक्रवाढ नफ्यापासून दूर जाल.

टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी

शेअर बाजारातील घसरणीच्या काळात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडील अधिक असलेला पैसा टप्प्याटप्प्यांमध्ये आहे त्या फंडामध्ये गुंतवावा. उदा. सध्या बाजार ५० दिवस मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ व्यवहार करत आहेत. अशा वेळी गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे असलेल्या अधिकच्या पैशाची तीन भागांत विभागणी करून एक भाग आता गुंतवावा, एक भाग बाजार अधिक कोसळले तर गुंतवावा आणि उर्वरित भाग बाजार स्थिर होऊन वाढीचे लक्षण दाखवेल त्यावेळेस गुंतवावा.

सध्या शेअर बाजारातील ‘निफ्टी’ या निर्देशकांचा पीई (प्राइस टू अर्निंग रेशो) २४ च्या आसपास आहे, यावरून बाजार थोडेसे महाग आहे असे समजले जाते. जेव्हा हा पीई २०च्या घरात जाईल तेव्हा बाजार स्वस्त झाले, असे समजू शकतो आणि त्यावेळेस गुंतवणूकदार त्यांच्याकडे असलेला अधिकचा पैसा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवू शकतात. ही वेळ त्यासाठी योग्य असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.