Outside RBI’s Delhi office, middlemen seek Rs 400 cut to exchange Rs 2000 note
Outside RBI’s Delhi office, middlemen seek Rs 400 cut to exchange Rs 2000 note Sakal

2,000 रुपयांची नोट बदलण्यासाठी 400 रुपयांचे कमिशन; RBIच्या कार्यालया बाहेर ब्रोकर मालामाल

2000 Rupees Note Exchange: 7 ऑक्टोबर 2023 ही बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख होती.
Published on

2000 Rupees Note Exchange: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्याची घोषणा केली होती. तीन दिवसांनंतर, 23 मे 2023 पासून, या नोटा जवळपासच्या बँका आणि RBI च्या प्रादेशिक कार्यालयांद्वारे परत करण्याची सुविधा देखील देण्यात आली होती. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत मध्यवर्ती बँकेने या नोटेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

7 ऑक्टोबर 2023 ही बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख होती. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) हे काम पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही अंतिम मुदत दिली होती, परंतु शेवटच्या क्षणी ती एका आठवड्याने वाढवण्यात आली होती.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालया बाहेर 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ब्रोकर 400 रुपये घेत आहेत. असे वृत्त मनीकंट्रोलने दिले आहे.

Outside RBI’s Delhi office, middlemen seek Rs 400 cut to exchange Rs 2000 note
Rahul Gandhi: 'मोदींचा आत्मा अदानींच्या हातात' अ‍ॅपल अलर्टचे थेट कनेक्शन...; राहुल गांधींचा मोठा आरोप

दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची अंतिम मुदत 7 ऑक्टोबर रोजी संपली आहे. पण RBI कार्यालयांमध्ये ही सुविधा अद्याप उपलब्ध आहे, ज्यांनी पूर्वी 2,000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलल्या नाहीत अशा लोकांच्या लांबच लांब रांगा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालया बाहेर लागल्या आहेत.

Outside RBI’s Delhi office, middlemen seek Rs 400 cut to exchange Rs 2000 note
जुलै-सप्टेंबरमध्ये सोन्याच्या मागणीत 10 टक्के वाढ, किंमती कमी झाल्यामुळे ग्राहकांची खरेदी

30 सप्टेंबर रोजी माहिती देताना रिझर्व्ह बँकेने सांगितले होते की, 31 मार्च 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील बाजारात 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2,000 रुपयांच्या नोटा होत्या. परंतु 29 सप्टेंबरपर्यंत यातील 96 टक्के नोटा बँका आणि RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमधून परत आल्या होत्या. त्यांची किंमत 3.43 लाख कोटी रुपये होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.