Job Alert: तरुणांसाठी खुशखबर! 'या' पोर्टलवर 20 लाखांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध, सरकारने दिली माहिती

National Career Service Portal: नॅशनल करिअर सर्व्हिस अर्थात एनसीएस पोर्टलवर नोकऱ्या शोधणाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे. NCS पोर्टलवर उपलब्ध नोकऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत.
NCS Portal
NCS PortalSakal
Updated on

NCS Portal: नॅशनल करिअर सर्व्हिस अर्थात एनसीएस पोर्टलवर नोकऱ्या शोधणाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे. NCS पोर्टलवर उपलब्ध नोकऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. वित्त आणि विमा क्षेत्रात 14.7 लाख, सेवा क्षेत्रात 0.75 लाख नोकऱ्या आहेत.

उपलब्ध नोकऱ्यांमध्ये उत्पादन क्षेत्रातील 0.71 लाख, वाहतूक क्षेत्रातील 0.59 लाख, आयटी आणि दळणवळण क्षेत्रातील 0.58 लाख, शिक्षण क्षेत्रातील 0.43 लाख, घाऊक आणि किरकोळ क्षेत्रातील 0.25 लाख आणि आरोग्य क्षेत्रातील 0.20 लाख नोकऱ्यांचा समावेश आहे.

सध्याच्या नोकऱ्या 12वी पास, ITI आणि डिप्लोमा पदवीधारकांसाठी आहेत. माहिती देताना मंत्रालयाने सांगितले की, ज्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे आणि ज्यांनी चांगली कौशल्य प्राप्त केली आहेत त्यांच्यासाठीही नोकऱ्या उपलब्ध आहेत.

NCS Portal
SEBI: एका दिवसात गुंतवणूकदारांचे किती नुकसान होते? सेबीच्या अध्यक्षांनी सांगितली धक्कादायक आकडेवारी

कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे चालवले जाणारे NCS पोर्टल हे नोकऱ्या शोधण्याचे एक चांगले माध्यम बनले आहे. या आठवड्यात सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 15 ते 29 वर्षे वयोगटातील लोकांचा बेरोजगारीचा दर सलग पाच वर्षांपासून घसरत आहे. 2023-24 मध्ये तो 10 टक्क्यांवर आला, 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 17.8 टक्के होता.

सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात 4.1 कोटी तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्य वाढवण्यासाठी पाच योजना आणि प्रोत्साहन जाहीर केले आहेत. पुढील 5 वर्षांत या योजनांवर 2 लाख कोटी रुपये खर्च केले जातील.

NCS Portal
Minimum Balance: मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली ग्राहकांची लूट सुरुच; बँकांनी कमावले 8,500 कोटी रुपये

तरुणांसाठी मोठी संधी

पोर्टलवर उपलब्ध असलेल्या रिक्त पदांची चांगली गोष्ट म्हणजे फ्रेशर्ससाठी भरपूर संधी आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पोर्टलवर उपलब्ध असलेल्या बहुतांश नोकऱ्या 12वी ते आयटीआय आणि डिप्लोमा शिकणाऱ्या तरुणांसाठी आहेत. उच्च शिक्षण आणि तज्ञ असलेल्या लोकांसाठी पोर्टलवर विशेष संधी देखील उपलब्ध आहेत.

नोकरी शोधणाऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि कंपन्यांना पात्र कर्मचारी शोधण्यात मदत करण्यासाठी मंत्रालयाने राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल सुरू केले आहे. आता त्याची नवीन आवृत्ती NCS 2.0 लाँच करण्यात आली आहे, ज्यात सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.