Deadline in June: आधार-पॅन आणि पेन्शनसह पैशांशी संबंधित 'ही' 6 कामे जूनमध्येच करा पूर्ण, अन्यथा होईल नुकसान

महत्त्वाच्या आर्थिक कामांची शेवटची तारीख जूनमध्ये संपत आहे.
Bank FD
Bank FDSakal
Updated on

Aadhaar PAN Link Last Date Extended: जून महिन्यात जर तुम्ही कामे वेळेत पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला पैशाशी संबंधित अनेक सुविधांचा लाभ घेता येणार नाही. पॅन कार्ड, आधार कार्ड आणि निवृत्ती वेतनासह 6 कामांची शेवटची तारीख जूनमध्ये संपत आहे. कोणती आहेत ही कामे जाणून घेऊया.

आधार-पॅन लिंकची अंतिम मुदत:

पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख जूनमध्ये संपत आहे. तारीख बदलून 30 जून 2023 करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या नियमांनुसार, प्रत्येकाला आधार कार्ड पॅनशी लिंक करणे अनिवार्य आहे.

प्रत्येकाला आपला पॅन आणि आधार क्रमांकाची माहिती द्यावी लागेल, असे आयकर विभागाने म्हटले आहे. यापूर्वी 31 मार्च 2023 ही अंतिम तारीख देण्यात आली होती, ती जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ईपीएस अर्ज करण्याची शेवटची तारीख:

ईपीएफओने पेन्शनसाठी अर्ज करण्याची मर्यादाही वाढवली आहे. EPFO ने दुसऱ्यांदा EPS मधून पेन्शनसाठी अर्ज करण्याची मर्यादा वाढवली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 ते 3 मार्च 2023 अशी चार महिन्यांची मुदत दिली होती.

कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मधून जास्त पेन्शन घेण्यासाठी EPFO ​​ने अर्जाची मर्यादा 26 जून 2023 पर्यंत वाढवली आहे.

यामध्ये, फॉर्म सबमिट करताना, कर्मचाऱ्यांना खात्री करावी लागेल की त्यांची सर्व EPF खाती एका युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) मध्ये विलीन झाली आहेत की नाही.

आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख:

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार धारकांना आधार तपशील ऑनलाइन मोफत अपडेट करण्याची तरतूद केली होती. ही सुविधा 15 मार्च 2023 पासून सुरू करण्यात आली.

14 जून 2023 पर्यंत तुम्ही ही सुविधा मोफत घेऊ शकता. ही सुविधा फक्त myAadhaar पोर्टलवर मोफत आहे, तर आधार केंद्रांवर 50 रुपये शुल्क सुरू राहील. UIDAI पुन्हा ओळख आणि पत्त्याचा पुरावा मागत आहे.

विशेषत: अशा लोकांकडून ज्यांचे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी बनवले गेले होते आणि ते कधीही अपडेट झाले नव्हते.

Bank FD
ITR Filing : आयटीआर भरताना या चुका मुळीच करू नका

बँक लॉकर कराराची अंतिम मुदत:

RBI ने लॉकर कराराच्या नूतनीकरणाची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे, ज्यामध्ये 50 टक्के काम 30 जून आणि 75 टक्के काम 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे.

इंडियन बँक स्पेशल एफडी:

इंडियन बँकेने विशेष FD "IND SUPER 400 DAYS" सादर केली होती. यामध्येही गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे.

या विशेष एफडी अंतर्गत बँक सर्वसामान्यांसाठी 7.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के आणि अति ज्येष्ठांसाठी 8 टक्के व्याज देत आहे.

SBI अमृत कलश:

एसबीआयच्या अमृत कलश स्पेशल एफडीची अंतिम तारीख 30 जून आहे. ही 400 दिवसांची FD आहे. सामान्य लोकांसाठी व्याज 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.60 टक्के व्याज आहे.

Bank FD
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.