PAN-Aadhaar Link: पॅन-आधार लिंक करण्याची तारीख गेली! मात्र आयकर विभागाने दिला मोठा दिलासा, कोणाला होणार फायदा?

काल म्हणजेच 30 जून 2023 ही आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची शेवटची तारीख होती.
Aadhar Pan Linking
Aadhar Pan Linkingesakal
Updated on

PAN-Aadhaar Link: 30 जून 2023 ही आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची शेवटची तारीख होती. आयकर विभाग लिंकिंग डेडलाइन वाढवणार की नाही याबद्दल अनेक लोक संभ्रमात आहेत.

सध्या, अंतिम मुदतीबाबत प्राप्तिकर विभागाकडून कोणतेही अपडेट आलेली नाही. परंतु प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी उशिरा एका ट्विटमध्ये आधार लिंकिंगसाठी शुल्क भरल्यानंतर पॅन धारकांना चलन डाउनलोड करण्यात अडचणी आल्याचे प्रकार घडले आहेत.

आयकर विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की अशी प्रकरणे समोर आली आहेत, जिथे पॅन-आधार लिंकिंगसाठी शुल्क भरल्यानंतर पॅन धारकांना चलन डाउनलोड करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे.

अशा प्रकरणांमध्ये, आयकर पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर 'ई-पे टॅक्स' टॅबमध्ये चलन भरण्याची स्थिती तपासली जाऊ शकते. पेमेंट यशस्वी झाल्यास, पॅन धारक आधारशी पॅन लिंक करण्याच्या प्रक्रियेसह पुढे जाऊ शकतो.

आयकर विभागाने दिलासा दिला

विभागाने ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की ज्या प्रकरणांमध्ये पॅन कार्डधारकाने पेमेंट केले आहे आणि संमती दिली आहे, परंतु 30 जून 2023 पर्यंत लिंक केलेले नाही, त्यांच्या प्रकरणांचा विभागाकडून विचार केला जाईल आणि दिलासा दिला जाईल.

चलन पावती डाउनलोड करण्याची गरज नाही

आयकर विभागाने सांगितले की, आधार पॅन लिंक करण्यासाठी चलन पावती डाउनलोड करण्याची गरज नाही. विभागाने म्हटले आहे की पॅन धारकाने यशस्वी पेमेंट पूर्ण केल्यावर, त्यांना चालानच्या प्रतीसह एक ईमेल पाठविला जात आहे. अशा परिस्थितीत त्यांना ते वेगळे डाउनलोड करण्याची गरज नाही.

Aadhar Pan Linking
HDFC Bank : एचडीएफसी जगातील चौथी मोठी बॅंक

हे नियम आहेत

पॅनला आधारशी लिंक करण्याचा कायदा 1 जुलै 2017 पासून लागू झाला आहे. काल म्हणजेच 30 जून 2023 ही लिंक करण्याची शेवटची तारीख होती.

अशा परिस्थितीत, जर एखादी व्यक्ती 30 जून 2023 पर्यंत आपले आधार पॅनशी लिंक करू शकली नसेल आणि नंतरच्या तारखेला लिंक करू इच्छित असेल, तर आयकर विभागाला दंड भरल्यानंतर दोन्ही लिंक केले जाऊ शकतात.

Aadhar Pan Linking
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()