पॅनकार्ड धारकांसाठी मोठी अपडेट आली आहे. लवकरच पॅनकार्ड बंद होणार आहेत. त्याऐवजी नवे पॅनकार्ड काढावे लागणार आहेत. पण हे सर्व पॅनकार्ड बाबत होणार नसून काही ठराविक लोकांनाच पॅनकार्ड बदलावे लागणार आहेत. याबद्दलचा आध्यादेश भारत सरकारने काढला आहे. काय आहे नक्की हे प्रकरण जाणून घेऊयात.
भारत सरकारने पॅन 2.0 च्या नवीन आवृत्तीला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे 78 कोटी लोकांना आता त्यांचे पॅनकार्ड बदलावे लागणार आहे. या बदलाचा मुख्य उद्देश करदात्यांच्या काही गोष्टी सुलभ होणे हा आहे.