PAN Update: करदात्यांच्या ओळखीसाठी असलेले पॅन कार्ड आता QR कोडसह तयार करण्यात येणार आहे. जेणेकरुन करदात्यांना सर्व गोष्टी डिजिटल पद्धतीने करता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने (CCEA) PAN 2.0 प्रकल्प सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
सरकारच्या या निर्णयाचा उद्देश सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींमध्ये पॅनचा वापर करणे हा आहे. या प्रकल्पासाठी सरकार एकूण 1435 कोटी रुपये खर्च करणार आहे.